esakal | "मेट्रो प्रकल्प रद्द केल्यास नुकसानच" - फडणवीस 
sakal

बोलून बातमी शोधा

fadanvis and bhujbal.jpg

देशात पहिल्यांदा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्राच्या मान्यतेला पाठविला. नाशिक मेट्रोसाठी "फिजिबल', "फास्ट' आणि परवडणारी सेवा असा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. केंद्राला ही संकल्पना आवडल्याने देशातील सात शहरांमध्ये नाशिकसारखा मेट्रो प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. म्हणूनच नाशिक मेट्रोबद्दल कुणाला शंका असल्यास त्या नीटपणे समजून घ्याव्यात.

"मेट्रो प्रकल्प रद्द केल्यास नुकसानच" - फडणवीस 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नागपूरमधील मेट्रो प्रकल्प अर्धवट असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. त्यामुळे विकासाला विरोध नसला, तरीही इतर शहरांचा अभ्यास करून नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प राबविला जाईल, असे ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले होते. त्यास रविवारी (ता. 29) येथे प्रत्युत्तर देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्प रद्द केल्यास नाशिकचे नुकसान होईल, असे सांगितले. 

देवेंद्र फडणवीसांचे भुजबळांना प्रत्युत्तर 
 पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की नाशिक मेट्रो "फिजिबल' नाही, असा अहवाल दिला गेल्याने नाशिकची स्वतःची व्यवस्था होऊ शकली नाही. त्यावर उपाय म्हणून देशात पहिल्यांदा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्राच्या मान्यतेला पाठविला. नाशिक मेट्रोसाठी "फिजिबल', "फास्ट' आणि परवडणारी सेवा असा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. केंद्राला ही संकल्पना आवडल्याने देशातील सात शहरांमध्ये नाशिकसारखा मेट्रो प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. म्हणूनच नाशिक मेट्रोबद्दल कुणाला शंका असल्यास त्या नीटपणे समजून घ्याव्यात. 
 
हेही वाचा > "मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते" : फडणवीस 

कर्नाटकातील मराठी बांधवांवरील अन्याय सहन करणार नाही  
कर्नाटकातील मराठी बांधवांवर अन्याय करू नये. अन्यथा महाराष्ट्र अन्याय सहन करणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या कर्नाटकमधील सरकारला दिला. ते म्हणाले, की कर्नाटकातील मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही पक्ष, विचार बाजूला ठेवून सगळे उभे आहोत. बेळगाव, कारवार, निपाणी आणि इतर गावांसह सयुक्तिक महाराष्ट्र झाला पाहिजे यास आमच्या सगळ्यांचे समर्थन आहे. 

नक्की बघा > VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षान्त समारंभ 

हेही वाचा > PHOTO : भाजप नगरसेविकेचा मृत्यू....मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क