"मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते" : फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

आपण सर्व जण भटके झालो आहोत. नोकरी-व्यवसायानिमित्त आपण आपले जन्मगाव सोडून इतरत्र वास्तव्यास आहोत. मात्र, कितीही केले तरी आपल्या गावाचा विसर आपल्याला पडत नाही. या खानदेश महोत्सवाच्या माध्यमातून खानदेशातील लोक एकत्र आले. आपल्या संस्कृतीचे सादरीकरण या महोत्सवात झाले. मी स्वत: किती मोठा खवय्या आहे, हे माझ्याकडे बघूनच आपणास लक्षात येईल. 

नाशिक : आपण सर्व जण भटके झालो आहोत. नोकरी-व्यवसायानिमित्त आपण आपले जन्मगाव सोडून इतरत्र वास्तव्यास आहोत. मात्र, कितीही केले तरी आपल्या गावाचा विसर आपल्याला पडत नाही. या खानदेश महोत्सवाच्या माध्यमातून खानदेशातील लोक एकत्र आले. आपल्या संस्कृतीचे सादरीकरण या महोत्सवात झाले. मी स्वत: किती मोठा खवय्या आहे, हे माझ्याकडे बघूनच आपणास लक्षात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खानदेश महोत्सवाचा समारोप करण्यात आला. या वेळी खानदेशरत्न पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणात राजकीय मुद्दे टाळत कार्यक्रमाच्या अनुषंगाने मनोगत व्यक्‍त केले. 

नवयुवकांना स्टार्टअप इंडिया उद्योजक मार्गदर्शन शिबिर

व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, महेश हिरे, लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने, सुनील बागूल आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी नवयुवकांना स्टार्टअप इंडिया उद्योजक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन संदीप फाउंडेशन यांनी केले होते. या शिबिरात ग्रामोदय ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शिबिरात उद्योजक कुंदन शिंदे यांनी डेअरी फार्म या विषयावर, सुजाता खरात यांनी फूड इंडस्ट्री या विषयावर, तर वेदांती सोरटे यांनी क्रिएटिव्ह हॅन्डमेड गिफ्ट आर्टिकल, निखिल कुलकर्णी यांनी स्टार्टअप इंडिया काय आहे, उद्योजक होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता आहे या सर्व विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराचे दीपप्रज्वलन आमदार सीमा हिरे, रश्‍मी हिरे-बेंडाळे यांच्या हस्ते झाले. प्रा. दीपक ह्याळीज यांनी सूत्रसंचालन केले. 

हेही वाचा > PHOTO : भाजप नगरसेविकेचा मृत्यू....मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क  
 
खानदेशरत्न पुरस्काराचे मानकरी  
प्रकाश कोल्हे, उद्धव आहिरे, विश्‍वास ठाकूर, सलीम शेख, दिलीप गिरासे, अजय बिरारी, सोनाली दाबक, आकाश छाजेड, विनिताताई सोनवणे-पाटील, बापूराव देसाई, संजय गिते, सुजाण नागरिक मंच यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खानदेशरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षान्त समारंभ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadanvis at Khandesh Mahotsav in Nashik Marathi News