लॉकडाउनमध्ये २ हजार महिलांना मातृवंदना योजनेचा लाभ; दहा लाखांचे अनुदान वितरण

दीपक अहिरे
Tuesday, 6 October 2020

गरोदरपणाचा काळ म्हणजे माता व बालक अशा दोन जिवाचा प्रश्‍न असतो. या काळात कष्टाचे काम न करता व योग्य पुरक आहार मिळावा, प्रसुतीनंतरही बाळाचे नीट लसीकरण व्हावे या हेतूने केंद्र शासनाने मातृवंदना योजना कार्यान्वीत केली.

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) चार महिन्याच्या लॉकडाऊन दरम्यानच्या काळात निफाडला दोन हजार महिलामातांना मातृवंदना योजनेचा लाभ झाला असून चार महिन्यात प्रशासनाकडून दहा लाखाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे तर साडेतीन वर्षात तालुक्यात १४ हजार मातांना ७० लाख रूपये वितरीत करण्यात आले आहे. 

गरोदरपणाचा काळ म्हणजे माता व बालक अशा दोन जिवाचा प्रश्‍न असतो. या काळात कष्टाचे काम न करता व योग्य पुरक आहार मिळावा, प्रसुतीनंतरही बाळाचे नीट लसीकरण व्हावे या हेतूने केंद्र शासनाने मातृवंदना योजना कार्यान्वीत केली. ही योजना लॉकडाऊनच्या काळात निफाड तालुक्यात भावी मातांना लाभदायक ठरली आहे. या योजनेतुन तीन टप्प्यांंमध्ये गरोदर आणि प्रसुती झालेल्या मातेला पाच हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. कोरोनाच्या सावटात गेली चार महिनने टाळेबंदी राहीली. काबाडकष्ट करणाऱ्या अनेक कुटुंबांची उपासमार झाली. पण अशा कष्टकरी कुटुंबात गरोदर मातांना मातृवंदना योजना मोठा आधार ठरली आहे. 
निफाड तालुक्यात गत साडेतीन वर्षात १४ हजार २०० मातांना ७० लाख रूपयांचा लाभ झाला आहे. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

अशी आहे योजना 

सन २०१७ पासुन मातृवंदना योजना सुरू झाली. गरोदर राहील्यापासुन १०० दिवसामध्ये शासकीय रूग्णालय, आरोग्य केद्रांमध्ये नोदंणी करणे बंधन कारक. ही नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिला व तिच्या पतिचे आधारकार्ड, महिलेच्या नावाचे आधार संलग्न पासबुकची झेरॉक्स या कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर १ हजार रूपये खात्यावर जमा होतात. महिना गरोदर राहील्यानंतर सहा महिने झाले की या योजनेतील दुसरा दोन हजार रूपयांचा निधी तिच्या खात्यावर जमा केला जातो. प्रसुतीनंतर बाळ साडेतीन महिन्यांचे झाले आणि त्याचे सर्व लसीकरण पुर्ण झाले की तिसरा दोन हजार रूपयांचा अंतिम लाभ खात्यामध्ये वर्ग होतो. 
 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

मातृवंदना योजनेचा गोरगरिब कुटुंबांतील माता चांगला लाभ झाला. योजनेमुळे माता व बाल मृत्युचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे. 
-डॉ.चेतन काळे (तालुका आरोग्य अधिकारी,निफाड). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 thousand women benefit from Matruvandana Yojana during lockdown nashik