चोरट्यांना कुलूपाची अलर्जी..दिसले कुलूप की तोडले!

घरफोटी प्रकरण.jpg
घरफोटी प्रकरण.jpg

नाशिक : बंद घराला कुलूप दिसले की तोड, असाच एककलमी फंडा जानेवारीत दिसून आला. चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, स्मार्ट पोलिस यंत्रणा मात्र सपशेल फोल ठरली आहे. 31 दिवसांत 75 घरफोड्या-चोरीच्या घटना घडल्या असून, यात इंदिरानगर, अंबड आणि पंचवटी आघाडीवर आहे. तीन कारसह 53 दुचाकीही चोरट्यांनी पळविल्या. या घटनांमुळे क्‍यूआर कोडच्या मागे धावणारे स्मार्ट पोलिस, चोरट्यांच्या मुसक्‍या आवळतील का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

तीन शिफ्टमध्ये पेट्रोलिंग सुरू 

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेनुसार स्मार्ट पोलिसिंगच्या माध्यमातून क्‍यूआर कोड वाढविण्यात आले. पोलिस चौक्‍या पुनरुज्जीवित करण्यात आल्या. गस्तीपथकांच्या संख्येत वाढ करताना, तीन शिफ्टमध्ये पेट्रोलिंग सुरू करण्यात आले. या उपाययोजना केल्या जात असतानाही जानेवारीत तब्बल 75 घरफोड्या-चोरीचे गुन्हे दाखल झाले. यात लाखोंचा ऐवज चोरट्यांनी नेला. इंदिरानगर हद्दीत सर्वाधिक 11, अंबड हद्दीत 10, पंचवटीत नऊ, तर मुंबई नाका व सरकारवाडा हद्दीत प्रत्येकी आठ-आठ घरफोडी-चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तुलनेने संवेदनशील भद्रकाली आणि नाशिक रोड हद्दीत घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. 

दुचाकी चोरट्यांनीही नाशिककरांच्या नाकेनऊ आणले

दुचाकी चोरट्यांनीही नाशिककरांच्या नाकेनऊ आणले आहे. महिनाभरात 53 दुचाकी पळविल्या आहेत. स्मार्ट आणि व्हिज्युलिंग पोलिसिंगऐवजी चोरट्यांचे प्रताप अधिक वाढल्याने शहरात पोलिस आहेत का, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. या महिनाभरात दहा सोनसाखळी खेचण्याचे गुन्हे, तर आठ मोबाईल हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय, टवाळखोरांकडून होणाऱ्या हाणामारीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. 

यावर लवकरच आळा घातला जाईल

घरफोडी आणि सोनसाखळी चोरट्यांचे आव्हान आहे. त्यांचा अटकाव करण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. -विश्‍वास नांगरे-पाटील, आयुक्त 


पोलिस ठाणे घरफोडी दुचाकीचोरी, सोनसाखळी चोरी 

मुंबई नाका 8 4, उपनगर 7 4, देवळाली कॅम्प 1 1, भद्रकाली 3 1, सरकारवाडा 8 3 
म्हसरूळ 2 1, नाशिक रोड 5 6, पंचवटी 9 5, गंगापूर 3 5, अंबड 10 6 
आडगाव 7 5, इंदिरानगर 11 4, सातपूर 2 4, सोनसाखळी चोरी - 10 (इंदिरानगर- तीन, मुंबई नाका- दोन, उपनगर- दोन, म्हसरूळ/पंचवटी/आडगाव - प्रत्येकी एक)  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com