जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान; उद्या होणार मतमोजणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी दहा लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी आठ लाख ८० हजार ६२ (८०.३६ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रक्रियेत ठिकठिकाणी उत्साहात मतदान झाले. 

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी दहा लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी आठ लाख ८० हजार ६२ (८०.३६ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रक्रियेत ठिकठिकाणी उत्साहात मतदान झाले. 

उद्या तालुकास्तरावर मतमोजणी

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीत ११ हजार ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, दहा लाख ९५ हजार १३४ मतदार गावाचे कारभारी निवडणार आहेत. मतमोजणी संदर्भात संबंधितांकडून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती जाणून घेतली. 

पंचायत समितीची पूर्वतयारी 

आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मोर्चेबांधणीची पूर्वतयारी म्हणून महत्त्व असलेल्या या गावोगावच्या निवडणुकांत प्रस्थापित विरुद्ध तरुणाई, असा सरळ संघर्ष रंगला. तालुक्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या मोठ्या गावातील राजकारणाने वातावरण ढवळून निघाले. सोमवारी (ता. १८) जिल्हाभर तालुकास्तरावर मतमोजणी होणार आहे. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

तालुका ... ग्रामपंचायती ... प्रभाग ... उमेदवार ... मतदार ... झालेले मतदान ... टक्केवारी 

कळवण...२७...७१...१५८...३३,३२८...२७,७१५...८३.३१ 
येवला...६१...१८५...४६३...१,१२,१९९...९४,६२५...८४.३४ 
इगतपुरी...७...१९...४३...८,७१०...७,५३१...८६.४६ 
दिंडोरी...५३...१५६...८२२...७६,८०५...६७,०४१...८७.२९ 
त्र्यंबकेश्वर...३...६...१३...१,३३०...१,१९१...८९.५५ 
सिन्नर...९०...२८०...६७५...१,५५,०५३...१३,०१,१८१...८३.९२ 
निफाड...६०..२१४...५२४...१,७८,२३५...१,३४,४२२...७५.४२ 
बागलाण...३१...९८...२८०...७४,२०४...५३,५७२...७२.२० 
चांदवड...५२.. १३९...३२२...७७,६१९...६५,३८८...८४.२४ 
देवळा...९...२६...५६...१६,०९१...१३,३७१...८३.१० 
नांदगाव...५४...१६२...३९४...९१,३६०...७१,७७४...७८.५६ 
मालेगाव...९६...३४०...९४६...२,०९,०३१...१,६२,४७३...७७.७३ 
नाशिक...२२...८२...२०५...६१,२६९...५०,८४१...८२.९८ 

एकूण...५६५...१,७७८...४,९११...१०,९५,१३४...८,८०,०६२...८०.३६  

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 percent polling for Gram Panchayats in district nashik marathi news