ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

'मी साईभक्त आहे, तुझे कल्याण करून देतो', असे सांगून दोन ढोंगीबाबांनी केला धक्कादायक प्रकार. आधी दगडाचा रुद्राक्ष करुन दाखवत विश्वास संपादन केला अन् नंतर केला हात साफ. मात्र प्रकार लक्षात येताच त्या भोंदूबाबांना पळता भूई थोडी. वाचा नेमके काय घडले?

नाशिक : 'मी साईभक्त आहे, तुझे कल्याण करून देतो', असे सांगून दोन ढोंगीबाबांनी केला धक्कादायक प्रकार. आधी दगडाचा रुद्राक्ष करुन दाखवत विश्वास संपादन केला अन् नंतर केला हात साफ. मात्र प्रकार लक्षात येताच त्या भोंदूबाबांना पळता भूई थोडी. वाचा नेमके काय घडले?

असा आहे प्रकार

शाहरुख नूर महंमद मदारी (वय २७, रा. काद्रीनगर, वैजापूर, जि. औरंगाबाद) व रशिद बुढन मदारी (रा. चाळीसगाव) असे संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी अरुण रामप्रताप गुप्ता (वय ३२, रा. चकगुरैनी, जि. कौशाम्बी, उत्तर प्रदेश) यांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.१३) सिल्वासा येथे जाण्यासाठी ते ठक्कर बाजार बसस्थानकात आले असता ही घटना घडली. गुप्ता गुजरात राज्यातील सिल्वासा येथील दमन प्लास्टिक कारखान्यातील कामगार आहेत. दमन प्लॅटफार्मवर बसलेले असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. हातचालखीने खाली पडलेल्या दगडाचे रुद्राक्ष करून त्यांनी गुप्ता यांचा विश्वास संपादन केला. साईभक्त असल्याचे भासवून संशयितांनी तुझे कल्याण करून देतो, असे सांगून गुप्ता यांनी परिधान केलेला टीशर्ट जसाचा तसा ताब्यात घेतला. यावेळी खिशातील वस्तूची गाठ बांधत संशयितांनी हालचालाखीने एक हजार रुपयांची रक्कम आणि मोबाईल लांबविला. ही बाब लक्षात येताच गुप्ता यांनी आरडाओरड केला. 

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

दुसरा साथीदार घटनास्थळावरून फरार

यावेळी गुन्हे शाखेा युनिट एकचे पोलिस कॉन्स्टेबल गौरव खांडरे हे तेथे गस्त घालत होते. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खांडरे यांनी तातडीने संशयित शाहरुख नूर महंमद मदारी यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळून चोरी केलेला मुद्देमाल तसेच एमएच १५, सीवाय ४००३ क्रमाकांची दुचाकी जप्त केली. त्याचा दुसरा साथीदार मात्र घटनास्थळावरून फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud case filed against two hypocrites at police station nashik marathi news