महापौरांना आधी शिवीगाळ..मग ठार मारण्याची धमकी..कोणी केले कृत्य? 

tahera shaikh.jpg
tahera shaikh.jpg

नाशिक / मालेगाव : महापालिकेची स्थायी समितीची बैठक तहकूब झाल्यानंतर राजकीय वाद उफाळून आले आहेत. स्थायी समिती सभापतींना अडचणीत आणण्याचे हे षडयंत्र असल्याच्या समजुतीतून महापौर व त्यांच्या परिवाराला ठार करण्याची धमकी दिल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. पण नेमके कारण काय?

नेमके काय घडले?

मालेगावचे माजी आमदार रशीद शेख व माजी नगराध्यक्ष युनूस ईसा कुटुंबीयांत पूर्ववैमनस्य आहे. महापालिका निवडणुकीनिमित्त हे वैमनस्य विसरून एकत्र आले होते. शिवसेना व एमआयएमच्या पाठिंब्याने शेख महापौर झाले होते.या पाठिंब्याचा मोबदला, म्हणून स्थायी समितीत डॉ. खालीद एकमेव सदस्य असताना, कॉंग्रेसने त्यांना दिलेल्या शब्दाला जागत सभापतिपद दिले. विधानसभा निवडणुकीत डॉ. खालीद व परिवाराने एमआयएमचे उमेदवार आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांचा प्रचार केला. एमआयएमचा महापालिकेतील गटही महागठबंधन आघाडीला सहकार्य करू लागला. त्यातून सुरू झालेली धुसफूस या वादापर्यंत पोचली. 

वादामुळे अंदाजपत्रकीय महासभेत मोठा पोलिस बंदोबस्त
मंगळवारी (ता. 23) स्थायी सभा तहकूब झाली. या वेळी महापौर ताहेरा शेख, नगरसेवक रशीद शेख, नगरसेवकांसह चर्चा करीत असताना, डॉ. खालीद यांनी स्थायी समिती सभेच्या मसुद्यावरून महापौर शेख यांना शिवीगाळ केली. त्यानंतरही वडील व भावासह त्यांच्या दालनात जाऊन परिवारास ठार करण्याची धमकी दिल्याची तक्रार श्रीमती शेख यांनी किल्ला पोलिस ठाण्यात दिली आहे. या वादामुळे अंदाजपत्रकीय महासभेत मोठा पोलिस बंदोबस्त व सशस्त्र फौजफाटा तैनात केला होता.

महापौरांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मालेगाव महापालिकेची स्थायी समितीची बैठक गणपूर्तीअभावी तहकूब झाल्यानंतर राजकीय वाद उफाळून आले आहेत. स्थायी समिती सभापतींना अडचणीत आणण्याचे हे षडयंत्र असल्याच्या समजुतीतून महापौर ताहेरा शेख व त्यांच्या परिवाराला ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेज, त्यांचे वडील ज्येष्ठ नगरसेवक युनूस ईसा व बंधू नगरसेवक माजीद युनूस यांच्याविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात महापौरांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com