मोठी बातमी : राज्यपाल बंदोबस्त आटोपून परततांना पोलिसांच्या गाडीला अपघात...

police van accident.jpg
police van accident.jpg

नाशिक : नंदूरबार जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या बंदो बस्तानंतर परतत असतांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातामध्ये पोलिस वाहनातील 10 कर्मचारी जखमी झाले आहेत. नंदूरबारपासून काही अंतरावर असलेल्या पथराई गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्या लगतच्या झाडावर जाऊन धडकल्याने सदराच अपघात झाला आहे. राज्यपाल कोश्‍यारी हे गुरुवारी (ता.20) नंदूरबार दौऱ्यावर होते. 

अशी घडली घटना

महाराष्ट्राचे राष्ट्रपाल भगतसिंग कोश्‍यारी हे गुरुवारी (ता.20) नंदूरबार जिल्हा दौऱ्यावर होते. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आलेले होते. 2015 मध्ये राज्यपालांनी अक्कलकुवा तालुक्‍यातील भगदरी (जि.नंदुरबार) हे गाव दत्तक घेतलेले आहे. याच गावाला भेट देऊन पाहणी करण्यासाठी गुरुवारी (ता.20) राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. याच दौऱ्यासाठी परजिल्ह्यातील पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आलेला होता. त्यानुसार, नाशिक ग्रामीण पोलिसांचे एक पथक धडगाव (जि.नंदुरबार) येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले होते. दौऱ्यानंतर तैनात असलेले बंदोबस्तातील 18 पोलिसांना घेऊन वाहन नंदुरबारला परत येत होते. नंदुरबारजवळ पथराई गावाजवळ चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले. मात्र, त्याचवेळी चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्यावरील दुसऱ्या वाहनांना धडक टाळण्यासाठी, पोलिस वाहन रस्त्याच्या खाली आणले आणि रस्त्यालगतच्या खड्ड्यात व झाडावर पोलिस वाहन आदळले. या पोलिस वाहनात असलेल्या 18 पोलिसांपैकी 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com