esakal | पैजेच्या नादात जीवाभावाच्या मित्रांची कायमचीच ताटातूट..! धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

seeta sarovar.jpg

पाचही मित्रांमध्ये सीता सरोवरात कोण अंघोळ करणार अशी पैज लागली होती.त्यात एकाने प्रथम उडी मारली, त्यानंतर चौघांनी उडी मारली परंतु या चौघांना पोहता येत नव्हते तरी उडी मारली.​ पण त्यानंतर...

पैजेच्या नादात जीवाभावाच्या मित्रांची कायमचीच ताटातूट..! धक्कादायक घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : म्हसरूळ हद्दीत प्राचीन सीता सरोवरात हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. 20) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकाराने परिसरात शोककळा पसरली.

प्राचीन सीता सरोवर परिसर...अशी लागली पैज

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील पाच मित्र रात्री साडे अकराच्या सुमारास सरोवरात रात्री उतरले. त्यातील हेमंत श्रीधर गांगुर्डे (33, रा. राजू नगर, पूर्वीचे नाव वैतागवाडी, म्हसरूळ) व हर्षल उर्फ विकी राजेंद्र साळुंखे (34, रा. ओमकार नगर, किशोर सूर्यवंशी रोड, म्हसरूळ) यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. हर्षल उर्फ विकी हा मायको कंपनीत ब्रेक मिळाल्यानंतर दिंडोरी रोडवरील एक हॉटेल काही महिन्यांपूर्वी चालवायला घेतल्याचे होते. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे. हेमंत गांगुर्डे हा इलेक्ट्रिक कामाचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.

परिसरात वेगळीच चर्चा.. 

या घटनेने म्हसरूळ परिसरात एकच शोककळा पसरली.परंतु हे पाचही मित्रांमध्ये सीता सरोवरात कोण अंघोळ करणार अशी पैज लागली होती.त्यात एकाने प्रथम उडी मारली, त्यानंतर चौघांनी उडी मारली परंतु या चौघांना पोहता येत नव्हते तरी उडी मारली. त्यातील दोघे बाहेर निघाले. परंतु हेमंत आणि विक्की उर्फ हर्षल हे बाहेर आलेच नाही,त्यातील एकाने हेमंत ला बाहेर काढले त्यांनतर या ठिकाणी पोलिस पोहचले अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला त्यानंतर विक्की उर्फ हर्षल सापडला,अशी चर्चा सुरू होती.

हेही वाचा > भयंकर! इमारतीच्या गेटवर नाव भलतेच..अन् आतमध्ये चालायचा "धक्कादायक' प्रकार..

प्रशासनाने उपाययोजना कराव्या

सीता सरोवर हा मद्यपीचा अड्डा बनला असून रात्री अपरात्री टवाळखोर येथे मद्य प्राशन करतात सरोवर प्राचीन असून त्याचे पावित्र्य हनन होता असून यावर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा >....ही बाब समजताच "शिवप्रेमी' भडकले..वातावरण चिघळले..

go to top