
पुतणीचे ६ जानेवारीला लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण व लग्नाची जय्यत तयारी सुरू होती, लाडक्या पुतणीचे लग्न म्हणून तो काकाही खुश होता. तिच्या लग्नाची खरेदी करायला बाजारातही गेला. पण अचानक नियतीचा घाला आला आणि क्षणार्धात सर्व काही संपलं. काकाच्या बातमीने वणी येथे हळहळ व्यक्त होत आहे.
वणी (जि.नाशिक) : पुतणीचे ६ जानेवारीला लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण व लग्नाची जय्यत तयारी सुरू होती, लाडक्या पुतणीचे लग्न म्हणून तो काकाही खुश होता. तिच्या लग्नाची खरेदी करायला बाजारातही गेला. पण अचानक नियतीचा घाला आला आणि क्षणार्धात सर्व काही संपलं. काकाच्या बातमीने वणी येथे हळहळ व्यक्त होत आहे.
पुतणीचे लग्न पाहणे त्या काकाच्या नशीबात नव्हतेच जणू; आनंद हिरावला क्षणार्धात
वणी येथील राज मेन्स पार्लरचे संचालक व वणी नाभिक समाज मडंळाचे कार्यकर्ते गुलाब चित्ते (वय ४५, रा. वणी) पुतणीच्या लग्नाच्या खरेदीसाठी कुटुंबासह नाशिकला गेले होते. दुपारी सर्व खरेदीनंतर चित्ते यांनी थंडी जास्त असल्याने पत्नी व तीन लहान मुलांना काळी-पिवळी टॅक्सीमध्ये बसवून ते एकटेच दुचाकीने वणीकडे येताना नाशिक-वणी रस्त्यावरील दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाजवळ सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान डंपरला ओव्हरटेकचा प्रयत्न करीत असताना धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच मृत झाले.
हेही वाचा - शुभमंगल सावधान आणि 'त्यांच्या' पासूनही जरा सावधान! टार्गेट सप्तपदीचा मुहूर्त
तीन मुली व सर्वांत लहान दोन वर्षांचा मुलगा
दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बुधवारी (ता.२३) दुचाकीस्वार ठार झाला. चित्ते यांना तीन मुली व सर्वांत लहान दोन वर्षांचा मुलगा आहे. नाभिक समाज मंडळाच्या विविध उपक्रम व कार्यक्रमांत तसेच मार्कंडेय पर्वत येथील रंगनाथबाबा आश्रमाच्या कार्यक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असे. पुतणीचे ६ जानेवारीला लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण व लग्नाची जय्यत तयारी सुरू असतानाच गुलाब चित्ते यांचा अपघाती मृत्यू झाल्याने वणी येथे हळहळ व्यक्त होत आहे.