शुभमंगल सावधान आणि 'त्यांच्या' पासूनही जरा सावधान! टार्गेट सप्तपदीचा मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 23 December 2020

कोरोना लॉकडाऊननंतर शासनाने लग्नसोहळ्याला परवानगी दिली आणि अनेकांनी रेशीमगाठी बांधल्या. पण याच वेळी काही लोकांनी याचा गैरफायदा देखील घेतल्याचे समजले. एकीकडे लग्नसोहळे धुमधडाक्यात साजरे होत असताना दुसरीकडे मात्र अशा लोकांपासून सावधान राहणेही तितकेच गरजेचे आहे. 

नाशिक : कोरोना लॉकडाऊननंतर शासनाने लग्नसोहळ्याला परवानगी दिली आणि अनेकांनी रेशीमगाठी बांधल्या. पण याच वेळी काही लोकांनी याचा गैरफायदा देखील घेतल्याचे समजले. एकीकडे लग्नसोहळे धुमधडाक्यात साजरे होत असताना दुसरीकडे मात्र अशा लोकांपासून सावधान राहणेही तितकेच गरजेचे आहे. 

शुभमंगल सावधान आणि 'त्यांच्या' पासूनही जरा सावधान!

शुभमंगल सुरू असताना वधू-वर मंडळींसह वर्‍हाडींनी सावधान राहणे गरजेचे आहे. शहरात लग्नसोहळे धुमधडाक्यात साजरे होत असताना ते थेट सप्तपदीचा मुहूर्त गाठत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील राजीवनगर शिवारातील एका हॉटेलमध्ये सप्तपदीचा मुहूर्त साधत चोरट्याने नवरीचे १० लाखांचे दागिने व एक लाखाची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच गंगापूर रोडवरील कवडे गार्डन लॉन्समधून गुरुवारी (ता. १७) चोरट्याने १ लाख ६ हजार रुपयांची रोकड, दागिने, मोबाईल व कागदपत्रे असा एकूण १ लाख १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. लग्नसमारंभात चोर्‍या करणार्‍या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत.

हेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ

लॉन्समधील खुर्चीवर ठेवलेली पर्स अचानक गायब

लग्न समारंभ सुरू असताना ओझर (ता. निफाड) विलास फकिरराव ताजणे यांची पत्नी कमल ताजणे यांनी पर्स लॉन्समधील एका खुर्चीवर ठेवली होती. त्यावेळी चोरट्याने त्यांची नजर चुकवून पर्स लंपास केली. पर्समध्ये ५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल, १ लाख ६ हजार रुपये, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ६ एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मतदान कार्ड असा एकूण १ लाख १६ हजार ५०० रुपयांची ऐवज होता. याप्रकरणी ओझर (ता. निफाड) विलास फकिरराव ताजणे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

हेही वाचा >> पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft at wedding nashik marathi news