हलगर्जीपणा भोवतोय! मास्क न घालणाऱ्या ११४ नागरिकांवर कारवाई

विक्रांत मते
Saturday, 14 November 2020

पूर्व विभागात उघड्यावर लघवी करणाऱ्या दोघांकडून चारशे रुपये दंड तर गोदावरी अस्वच्छता करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पश्‍चिम विभागात दोन तर पुर्व विभागात एकावर कारवाई करण्यात आली. तिघांकडून पाच हजार ४०० दंड वसुल करण्यात आला.

नाशिक : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत उसळलेल्या गर्दीतही मास्क परिधान न करणाऱ्या तब्बल ११४ नागरिकांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली. दंडात्मक कारवाईतून साडे सतरा हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. सोळा प्रकारच्या कारवाईतून एक लाख ४५ हजार रुपये दंड वसुली झाली.

पश्‍चिम विभागात सर्वाधिक कारवाई

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बाजारपेठेत वावरतांना नागरिकांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले होते. लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय सहा भरारी पथकांची नियुक्ती केली होती. गेल्या आठ दिवसात नाशिकरोड विभागात २५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून चार हजार ८०० रुपये दंड वसुली करण्यात आली. सिडकोत २७ नागरिकांवर कारवाई करताना ५४०० रुपये दंड वसुल झाला. सातपूर विभागात दोन जणांकडून चारशे रुपये तर पश्‍चिम विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. ५९ नागरिकांकडून अकरा हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला. पुर्व विभागात एका नागरिकावर कारवाई करण्यात आली. 

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोघांना दंड

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या चौघांवर कारवाई करताना सात हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. रस्त्यावर घाण टाकणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोघांना दोन हजार रुपये दंड करण्यात आला. पूर्व विभागात उघड्यावर लघवी करणाऱ्या दोघांकडून चारशे रुपये दंड तर गोदावरी अस्वच्छता करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पश्‍चिम विभागात दोन तर पुर्व विभागात एकावर कारवाई करण्यात आली. तिघांकडून पाच हजार ४०० दंड वसुल करण्यात आला.

प्लॅस्टीक वापरावर बंदी

प्लॅस्टीकचा वापर करणाऱ्या सिडको व पुर्व विभागातील प्रत्येकी एकावर दंडात्मक कारवाई करताना दहा हजार रुपये दर सातपूर विभागात दोघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. पश्‍चिम विभागात पाच जणांकडून पंचवीस हजार रुपये वसुल करण्यात आले. पंचवटीत एकावर कारवाई करण्यात आली. पाळीव श्‍वानांना रस्त्यावर सोडल्यानंतर घाण केल्याने श्‍वानांच्या मालकांना दंड करण्यात आला.

हेही वाचा >  अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

मोकळ्या भुखंडावर कचरा

मोकळ्या भुखंडावर कचरा टाकण्यास बंदी असतानाही आठ दिवसात दहा जणांवर कारवाई करण्यात आली. नाशिकरोड, सातपूर व पंचवटी विभागात एक, सिडकोत पाच तर पुर्व विभागात दोघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३२ हजार २४० रुपये दंड वसुली करण्यात आली.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against 114 citizens for not wearing masks nashik marathi news