अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

अरुण खंगाळ
Saturday, 14 November 2020

कांद्याच्या भावात चढउतार झाले, की गल्लीपासून दिल्लीपर्यंत कांद्याची संपूर्ण देशभरात चर्चा होते. पण गुरुवारी (ता.१२) चक्क ‘कौन बनेगा करोडपती’च्या १२ व्या सीझनमध्ये हा कांदा जाऊन पोहचला. काय घडले नेमके?

लासलगाव (जि.नाशिक) : कांद्याच्या भावात चढउतार झाले, की गल्लीपासून दिल्लीपर्यंत कांद्याची संपूर्ण देशभरात चर्चा होते. पण गुरुवारी (ता.१२) चक्क ‘कौन बनेगा करोडपती’च्या १२ व्या सीझनमध्ये हा कांदा जाऊन पोहचला. काय घडले नेमके?

लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात

गुरुवारी (ता.१२) ‘कौन बनेगा करोडपती’च्या १२ व्या सीझनमध्ये ‘लासलगाव का प्याज किस राज्य का है?’ असा प्रश्न विचारला होता. कधी शेतकरी ते कधी ग्राहकांना रडविणाऱ्या कांद्यावर ‘केबीसी’मध्ये प्रश्‍न आल्याने लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. दीपावलीनिमित्त दोन दिवसांपासून जिल्ह्यासह लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. मात्र बाजार समिती बंद असतानाही लासलगावच्या कांद्याचा नामोल्लेख ‘कौन बनेगा करोडपती’च्या शोमध्ये झाल्याने लासलगावकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे.  

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

लासलगावच्या कांद्यावरील प्रश्न

आशिया खंडातील अग्रेसर लासलगावचा कांदा बाजारपेठेतील कांद्याला मानांकन मिळाल्यानंतर आता ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी लासलगावच्या कांद्यावरील प्रश्न विचारल्याने कांद्याच्या माध्यमातून लासलगाव शहराला बहुमान मिळाला आहे.

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lasalgaon onion On Kaun Banega Crorepati show nashik marathi news