
नाशिक/ मालेगाव : रमजानपुरा भागात यंत्रमाग बंद करण्यासाठी गेलेल्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला नाही. यंत्रमाग कारखान्यात गेलेले दोघे कर्मचारी साहित्य घेण्यासाठी गेले होते. या संदर्भात कुठलीही नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही. संशयितांना मारहाण, दमबाजी व दांडगाई करण्यात आल्याच्या तक्रारी आल्यानंतर संबंधित उपनिरीक्षकांवर खात्यांतर्गत कारवाई करण्यात आली. यंत्रमाग सुरू असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. या संदर्भात सविस्तर चौकशी व माहिती घेण्यात येत आहे, अशी अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. या प्रकरणासंदर्भात दावे, प्रतिदावे सुरू झाले आहेत. कारवाईमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले, असे बोलले जात आहे. उलट संबंधित उपनिरीक्षकाने दांडगाई केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अपर पोलिस अधीक्षकांची माहिती; मालेगाव विभागात 140 गुन्हे दाखल
रमजानपुरा भागातील यंत्रमाग कारखाना बंद करण्यासाठी गेलेले उपनिरीक्षक सूरज आगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी कारखान्यातील कामगारांनी हुज्जत घातली. या वेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून कारखाना बंद केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांकडे खुलासा मागितला. दरम्यान, कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांसह अन्य संशयितांविरोधात कलम 188 प्रमाणे मालेगाव शहरात 45 पेक्षा अधिक, तर शहर वगळून मालेगाव परिमंडलात 140 गुन्हे दाखल केल्याचे अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत. त्यात यंत्रमागाचा समावेश नाही. यंत्रमागासह अत्यावश्यक सेवेत समावेश नसलेल्या आस्थापनांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली. एका आठवड्यात विभागात 140 गुन्हे दाखल झाले आहेत.
मुस्लिम बांधवांनी घरीच दुआपठण करा
दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा घुगे यांनी दिला आहे. आगामी शब- ए-बरात सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांसाठी घरीच दुआपठण करावे. कब्रस्तानात श्रद्धांजली वाहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन कब्रस्तानच्या ट्रस्टींनी पोलिसांसमवेत झालेल्या बैठकीनंतर केल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.