जिल्ह्याची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा दहा हजारांच्या उंबरठ्यावर; रुग्णसंख्येत ४८५ ने वाढ

अरुण मलाणी
Sunday, 4 October 2020

कोरोनामुक्‍त झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील १७९, नाशिक ग्रामीणचे १२७, मालेगावचे ४९, तर जिल्हाबाह्य नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सतरा मृतांमध्ये नाशिक शहरातील नऊ, ग्रामीणचे सात आणि जिल्हाबाह्य एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यूची नोंद आहे.

नाशिक : सप्टेंबर महिनाअखेरीस नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांचा दिवसभरातील आकडा एक हजारांपेक्षा कमी आला होता. त्यातच शनिवारी (ता. ३) पुन्हा एकदा नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या एक हजारांच्या आत राहिली. दिवसभरात ८६६ बाधित आढळून आले. तर ३६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सतरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातून ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत ४८५ ने वाढ झाली आहे. 

दिवसभरात नवे ८६६ बाधित, बरे झाले ३६४ रुग्ण

यापूर्वी सहा हजारांपर्यंत घटलेली ॲक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या पुन्हा एकदा वाढली असून, सद्यःस्थितीत नऊ हजार ४४४ बाधितांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. शनिवारी आढळलेल्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ४४७, नाशिक ग्रामीणमधील ३५५, मालेगावचे ५०, तर जिल्हाबाह्य चौदा रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील १७९, नाशिक ग्रामीणचे १२७, मालेगावचे ४९, तर जिल्हाबाह्य नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सतरा मृतांमध्ये नाशिक शहरातील नऊ, ग्रामीणचे सात आणि जिल्हाबाह्य एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यूची नोंद आहे. यातून आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७९ हजार २८० झाला आहे. यापैकी ६८ हजार ४०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

एक हजार ४२७ बाधितांचा मृत्यू

आतापर्यंत एक हजार ४२७ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात आढळलेल्या संशयितांमध्ये नाशिक महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात एक हजार २७६, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात २०३, मालेगाव महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात १७, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १२, तर जिल्हा रुग्णालयात दहा संशयित दाखल केले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ३३८ अहवाल प्रलंबित आहेत. यापैकी ९८८ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.  

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The active patients in district is again on the threshold of ten thousand nashik marathi news