'सर, याच्याकडे बंदूक आहे!'...अन् शाळेत उडाली खळबळ...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 February 2020

(जुने नाशिक) सीबीएसजवळील एका शाळेत विद्यार्थ्याकडे एअरगन आढळल्याने एकच खळबळ उडाली. शाळेच्या विद्यार्थ्याकडे अशाप्रकारची एअरगन सापडणे खरे तर अत्यंत शोकांतिका आहे. मोठा अनर्थ होऊ शकतो. भद्रकाली पोलिसांनी एअरगन जप्त केली असून, पोलिसांत नोंद केली आहे. विद्यार्थ्याकडे एअरगन आली कुठून? याचा शोध पोलिस घेत आहेत. 

नाशिक : (जुने नाशिक) सीबीएसजवळील एका शाळेत विद्यार्थ्याकडे एअरगन आढळल्याने एकच खळबळ उडाली. शाळेच्या विद्यार्थ्याकडे अशाप्रकारची एअरगन सापडणे खरे तर अत्यंत शोकांतिका आहे. मोठा अनर्थ होऊ शकतो. भद्रकाली पोलिसांनी एअरगन जप्त केली असून, पोलिसांत नोंद केली आहे. विद्यार्थ्याकडे एअरगन आली कुठून? याचा शोध पोलिस घेत आहेत. 

असा आहे प्रकार

सीबीएसजवळील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याकडे गुरुवारी (ता.13) बंदूक असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. याबाबत मुख्याध्यापकांना माहिती देण्यात आली. त्यांनी शाळेच्या वरिष्ठांशी चर्चा करून शनिवारी (ता.15) भद्रकाली पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बंदूक ताब्यात घेतली. पोलिसांनी शिक्षक, विद्यार्थ्याची चौकशी केली. विद्यार्थ्याकडे आढळलेली बंदूक नसून एअरगन असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मुख्याध्यापक, उपमुख्या ध्यापक, शिक्षकांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावून सविस्तर माहिती जाणून घेतली. विद्यार्थी अल्प वयीन असल्याने पोलिसांनी त्यास समज देत त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. 

हेही वाचा > प्रदर्शन बघायला 'तो' आला तर खरा...पण, जीवानिशी गेला!...

विद्यार्थ्यांच्या पालकांना गनबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनाही काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थीही ही गन कुठून आणली, याची माहिती देऊ शकला नाही. गन त्या विद्यार्थ्याचीच आहे किंवा अन्य कुणी त्याच्याकडे ठेवली होती का, याचीही चौकशी पोलिस करीत आहेत. विद्यार्थ्याकडून त्याचा दुरुपयोग झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असता.  

हेही वाचा >  PHOTO : खेळता खेळता 'ती' थेट पोहचली अनोळखी रस्त्यावर...अन्


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in adarsh school found an airgun from student nashik marathi news