esakal | प्रदर्शन बघायला 'तो' आला तर खरा...पण, जीवानिशी गेला!...
sakal

बोलून बातमी शोधा

विनोद तोकडे.jpg

विशेष म्हणजे सर्व आरोपी हे वीस वयाच्या आतील असुन थेट खून करण्याचे धाडस केल्याने नागरिकांत भीतीचे वाता वरण निर्माण झाले आहे. प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने मनोरंजन कार्यक्रम व दुकाने बंद केली.

प्रदर्शन बघायला 'तो' आला तर खरा...पण, जीवानिशी गेला!...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : घोटीतील डांगी संकरित जनावरांच्या प्रदर्शनात देवळे (ता. इगतपुरी) येथील युवकाचा मध्यरात्री दरम्यान शनिवारी (ता.१५) खून झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रदर्शनाचा दुसरा दिवस अन् त्यातही घडला असा प्रकार यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

असा आहे प्रकार 

देवळे येथील विनोद मच्छीद्र तोकडे (वय २०) हा आपल्या मित्रांसोबत डांगी संकरित जनावरांचे प्रदर्शन पाहण्यासाठी आला होता. दरम्यान, यावेळी माणिखांब (ता. इगत पुरी) येथील संशयित आरोपी सागर गोविंद चव्हाण (वय २०) रवींद्र बाळू चव्हाण (वय १९) आकाश ज्ञानदेव चव्हाण (वय २०) रामदास उर्फ राम बाळू चव्हाण ( वय १९ ) अनिकेत अंबादास चव्हाण ( वय २० ) जगन राज चव्हाण ( १९ ) अमोल रामदास चव्हाण ( वय २० ) यांनी मयत विनोद याच्या डोक्यात सुरवातीला डोक्यात लोखंडी रॉड मारत खाली पाडले, नंतर लाथाबुक्यांनी मारहाण करत पोटात चाकू भोसकून ठार केले. 
खुनाची घटना होताच नागरिकांनी तेथून पळ काढला. संशयित आरोपी फरार होत असतांना घटनास्थळी धाव घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या पथकाने जाग्यावरच आरोपींना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे सर्व आरोपी हे वीस वयाच्या आतील असुन थेट खून करण्याचे धाडस केल्याने नागरिकांत भीतीचे वाता वरण निर्माण झाले आहे. प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने मनोरंजन कार्यक्रम व दुकाने बंद केली. नागरिकांना शांततेचे अवाहन करत आरोपींना पोलीस ठाण्यात आणत रात्री आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा > पर्यावरणपूरक शाश्‍वत विकासाला हवे प्राधान्य! 

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

पाच दिवसांपुर्वी या टोळक्याचे हॉटेल किनाऱ्यावर धुडगूस घातल्याची खबर आहे. दरम्यान घटनास्थळी दाखल होत पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवालदार बिपिन जगताप, विश्वास पाटील, अशोक कोरडे, भास्कर शेळके, शितल गायकवाड, संतोष दोंदे, भास्कर महाले, लहू सानप, रमेश चव्हाण, प्रकाश कासार, शरद कोठुळे, रामकृष्ण लहामटे यांनी मोठ्या धडाडीने आरोपींना जाग्यावरच झडप घालत ताब्यात घेतले.

हेही वाचा > गांधीगिरीमुळे थकीत मालमत्ताधारकांची गोची!...घरांसमोर जाऊन ढोल-ताशा, बॅंड अन् भोंगा...

go to top