ऐकावं ते नवलच! यंदा अधिक मासात शेतकरी कुटुंबाचं जावायाला अनोखं वाण; चर्चेला उधाण

खंडू मोरे
Sunday, 4 October 2020

सध्या अधिक मास सुरू असल्याने व अधिक मासात मुली व जावयाला वाण लावण्याची पद्धत आहे.भेंडी ता. कळवण येथील शेतकरी कुटुंबाने आपल्या भाचे व जावयांना दिलेल्या अनोखे वाण दिले. सध्या सोशल मिडीयावर हा विषय कसमापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. तर अनेकजण या गोष्टीचे कौतुक देखील करत आहेत.

नाशिक : (खामखेडा) सध्या अधिक मास सुरू असल्याने व अधिक मासात मुली व जावयाला वाण लावण्याची पद्धत आहे.भेंडी ता. कळवण येथील शेतकरी कुटुंबाने आपल्या भाचे व जावयांना दिलेल्या अनोखे वाण दिले. सध्या सोशल मिडीयावर हा विषय कसमापट्ट्यात मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. तर अनेकजण या गोष्टीचे कौतुक देखील करत आहेत.

मिठाई व सराफ व्यवसायिक आघाडीवर

अधिक मासात जावयाला वाण देण्याची प्रथा असते. याला धोंडा असेही म्हणतात. जावयांसाठी हा सुगीचा महिना ठरतो. विशेषतः नवविवाहितांसाठी सासूरवाडीहून भेटवस्तूंची रेलचेल सुरू होते. कुठल्याही गोष्टीचे मार्केटिंग साहजिकच सुवर्णपेढ्या आणि मिठाई व्यापारी तयार करून व्यापाऱ्यांनी ठेवली आहेत. करण्याच्या अलीकडच्या जमान्यात अधिक मासाचंही मार्केटिंग छान होऊ लागलं आहे. त्यात मिठाई व सराफ व्यवसायिक आघाडीवर आहेत. आकर्षक सजावटीमध्ये दुकानात अनारसे, बत्तासे, म्हैसूरपाक यांची पाकिटे सुवर्णपेढ्यांनीही जावयांना खूश करण्यासाठी आकर्षक चांदीचे दिवे, दुकानात विक्रीसाठी ठेवले आहेत.

कांदा बियाणांची अभूतपूर्व टंचाई

सध्या जास्तीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा खराब होत आहेत. महागडे बियाणे खरेदी करून देखील अतिपावसामुळे बियाण्यांचा उतारा झाला नाही. त्यामुळे व उन्हाळ कांद्याला मिळत असलेल्या चांगल्या बाजार भावामुळे कांद्याच्या रोपाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या बियाण्यांवर उड्या पडल्या आहेत. मात्र नाशिकसह राज्यभरात कांदा बियाणांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दर तब्बल दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

वाण म्हणुन प्रत्येकी एक एक पायली कांदा बियाणे

पण एक शेतकरी कुटुंबात आगळावेगळा धोंडा बघायला मिळाला. कळवण तालुक्यातील भेंडी येथील शेतकरी रावण रौंदळ, दीपक रौंदळ, अशोक रौंदळ या मामांनी आगळा वेगळा धोंडा करण्याचे ठरविले. आपल्या विवाहित व अविवाहित भाच्यांना धोंडा निमीत्ताने आमंत्रण देऊन योगेश नानाजी पाटील (दह्याने)ओतूर ता. कळवण व अविवाहित भाचे अक्षय प्रशांत निकम विठेवडी ता देवळा याना भेंडी येथे आग्रहाचे आमंत्रण दिले. जेवणाच्या ताटासमोर दोघेही भाच्यांना वान म्हणुन प्रत्येकी एक एक पायली कांदा बियाण्याचे वाण ठेवण्यात आले. हे बघुन दोघेही भाचे आनंदित झाले कारण सध्या कांदा बियाणे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दरदुपट्ट झाला आहे. प्रत्येकाने हे जोपासले पाहिजे हि काळाची गरज आहे कुठेही जास्त खर्च न करता प्रत्येकाने जावयाला व भाच्यांना अशा प्रकारे धोंडा निमीत्ताने वान लावल्याने हा विषय सध्या सोशल माध्यमांमध्ये कौतुकाचा ठरत आहे व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून लाखो लोकांनी या फोटोला पोस्ट केलेले आहे.

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adhik maas unique gift from a farmer family nashik marathi news