नाशिकमध्ये भाजपचा आणखी एक नेता शिवसेनेच्या वाटेवर? भाजपला तिसरा धक्का

after bagul and gite another BJP leader will join Shiv Sena nashik marathi political news
after bagul and gite another BJP leader will join Shiv Sena nashik marathi political news

नाशिक  : महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आल्या असताना नाशिकमधील राजकीय वातवारण चांगलेच तापले आहे. शुक्रवार (ता. ८० भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनिल बागुल यांनी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यापाठोपाठ भाजपचे आणखी एक दिग्गज नेते त्यांच्यासमर्थकांसह सेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजपला तिसरा धक्का?

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी  शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना शिवसेनेपासून वेगळे करत भाजपमध्ये घेण्यात आले. त्यावर शिवसेना देखील आक्रमक झाली असून भाजपला जोरदार धक्का दिला आहे. शुक्रवार (ता. ८)  भाजपचे माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे देखील सेनेत प्रवेशाच्या  वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. दिनकर पाटील यांनी सेनेत  भाजपच्या 4 नगरसेवकांसह प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे.

तर सत्ताधारी भाजप अल्पमतात जाणार

दिनकर पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीमुळे दिनकर पाटील यांचा सेनेत प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. एवढंच नाहीतर भाजपचे 11 विद्यमान नगरसेवक सुद्धा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे  सभागृहात, सत्ताधारी भाजप अल्पमतात जाण्याचे संकेत मिळत आहे. हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com