
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले हे योग्य नाही, पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावे, असे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौैऱ्याच्या वेळी व्यक्त केले आहे.
नाशिक : धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले हे योग्य नाही, पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावे, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौैऱ्याच्या वेळी व्यक्त केले आहे.
राज्यातील राज्यकर्त्यांना आरोप लावण्याची सवय लागली आहे, महाराष्ट्राला कमी प्रमाणात लस मिळाल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगत हा आरोप नाकर्तेपणा लपविण्याचा प्रकार आहे. त्याबरोबरच, कृषी कायदे रद्द करण्या संदर्भात समिती स्थापन केली असून, त्यासंदर्भातील शंका लवकर दूर होतील अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगीतले. तसचे औरंगाबाद शहराच्या नामांतरनाबद्दल संभाजी नगर नामांतरावरुन काँग्रेस शिवसेनेचं मिलिजुली असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज बुधवारी (ता. १३) नाशिक दौऱ्यावर आहेत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार असून. वसंत गिते व सुनील बागूल यांनी भाजपला केलेला रामराम व माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पक्षात पुर्नगामनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात