esakal | संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

rape-1.jpg

या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसांनी एक अल्पवयीन मुलासह, महिला व पाच युवकांना ताब्यात घेतले आहे. या सात जणांविरोधात सामुहिक अत्याचार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक : नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळा येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात जणांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (ता. 10) उघडकीस आली आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसांनी एक अल्पवयीन मुलासह, महिला व पाच युवकांना ताब्यात घेतले आहे. या सात जणांविरोधात सामुहिक अत्याचार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अशी आहे घटना

रविवार (ता. 10) सामनगाव रोडवरील अरिंगळे मळा येथे धक्कादायक घटना घडली. दिपक समाधान खरात (वय १९), रवि शंकर कु-हाडे (वय १९), सुनिल लिंबाजी कोळे (वय २४), आकाश राजेंद्र गायकवाड (वय २४), सोमनाथ विजय घरात (वय १९), पुजा सुनिल वाघ (वय १९) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित पुजा वाघ हिने पीडितेला स्वत:च्या घरी बोलावून घेतले. पीडितेला जरा सुद्धा भनक नव्हती की यामागे काहीतरी षड्यंत्र असेल. पीडिता पुजा हिच्या घरी जाताच संशयित सहा युवक तिथे आले. त्या नराधमांनी आळोपाळीने पीडितेवर अत्याचार केले. पीडिता घडलेल्या प्रकाराने घाबरली होती. पीडितेचे आई-वडील मजुरी करत असल्याने ते कामावर गेले होते. पीडिता भेदरलेल्या स्थितीत गच्चीवर एका कोपऱ्यात जावून बसली. आई घरी येताच मुलीला अशा अवस्थेत बघून घाबरली. आईने विचारले असता पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. आईने थेट पोलिस स्टेशन गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

एक महिलेसह सहा संशयितांना अटक

यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पथकाला त्यांच्या शोधात रवाना केले. मध्यरात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलासह महिला व अन्य पाच युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना रविवारी (ता.10) सकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन या घटनेचा सखोल तपास सुरु असल्याचे खरात यांनी सांगितले.

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार