हाउज द जोश! वयाच्या ऐंशीव्या वर्षीही वृत्तपत्र विक्री करणारे मधुकर कोष्टी; ६८ वर्षांपासून सेवा

माणिक देसाई
Wednesday, 14 October 2020

त्याकाळात नाशिकरोड ते मनमाडपर्यंत रेल्वेत प्रवाश्यांसाठी सेवा दिली. हे करत असतांनाच साधारणपणे दहा वर्षापुर्वी एकुलता एक मुलगा महेशचे आकस्मिक निधन झाले त्यातुन खचुन न जाता त्याचा मुलगा पियुष कोष्टी याला संगणक अभियंता बनविण्याचे स्वप्न बघितले.

नाशिक : (निफाड) ऊन, वारा अन् पाऊस कशाचीही तमा न बाळगता निफाडकरांना अव्ह्यातपणे भल्या पहाटे वृत्तपत्र सेवा देणारा अवलिया म्हणुन मधुकर कोष्टी काका हे प्रख्यात आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ते वृत्तपत्र वाचकांसाठी सेवा बजावत आहे. 

६८ वर्षांपासून वृत्तपत्र व्यवसाय

निफाड शहरातील मधुकर कोष्टी काका वयाच्या दहाव्या वर्षापासुन वृत्तपत्र व्यवसाय करत आहे. साधरणपणे १९५२ पासुन वडिलांनी चालवलेल्या वृत्तपत्र व्यवसायात पदार्पण केले. त्याला आज ६८ वर्षांचा काल लोटला आहे. भल्या पहाटे सकाळी तीन वाजता उठायचं आणि सायकल घेऊन बसस्थानक गाठायचं. पेपरचे गठ्ठे घ्यायचे, त्यांच्या पुरवण्या लावत पिशव्या भरत त्या सायकला टांगत निफाड शहर आणि परीसरातील उपनगगरे गावांत वृत्तपत्रे वितरण करायचे. हा दिनक्रम कोष्टी काकांचा ठरलेला आहे. मग उन्हाळा असोत की पावसाळा असोत हिवाळा यांची त्यांनी परवा केलेली नाही. ग्राहकांना वेळेत वृत्तपत्र मिळालेच पाहीजे यासाठी ते सदैव तत्पर असतात.  

लताताई कोष्टी यांची व्यवसायात भक्कम साथ

४१ वर्ष त्यांनी नाशिकच्या प्रतिभुती मुद्राणालयात कर्मचारी म्हणुन काम केले. त्याकाळात नाशिकरोड ते मनमाडपर्यंत रेल्वेत प्रवाश्यांसाठी सेवा दिली. हे करत असतांनाच साधारणपणे दहा वर्षापुर्वी एकुलता एक मुलगा महेशचे आकस्मिक निधन झाले त्यातुन खचुन न जाता त्याचा मुलगा पियुष कोष्टी याला संगणक अभियंता बनविण्याचे स्वप्न बघितले. तो आता तिसऱ्या वर्षाला पुण्यात शिकत आहे. काकांच्या पत्नी लताताई कोष्टी ह्या पण त्यांना व्यवसायात भक्कम साथ करत आहे. सकाळी सहा वाजताच निफाड बसस्थानकात स्टॉल लावुन एसटीच्या प्रवाश्यांसाठी वृत्तपत्र सेवा देत असून त्या देखील १९७७ पासुन हा व्यवसाय संभाळत आहे. दरम्यान पत्नी, सुन, नातु आणि तीन मुली, जावई, भाऊ असा गोतवळा आहे.

हेही वाचा >  धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

सायकल जीवनातील महत्त्वाचा घटक

अनेकजण शरिर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करतात. सायकलिंग करतात. पण निफाडचे कोष्टी काका गेली ऐंशी वर्षापासुन नित्यनियमाने निफाड परीसरात सायकलवरुन पेपर वितरण करत असल्यामुळे ते आजही ठणठणित आहे. अगदी तरुणांना लाजवेल असे कष्टी काका त्यांच्या तंदुरुस्ती का राज सायकल बनली आहे असे सांगता. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the age of eighty, Koshti Kaka is selling newspapers nashik marathi news