esakal | एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

vaishali khetre 1.jpg

लॉकडाऊनमुळे केवळ शहरातील कामगारांचे नाही तर ग्रामीण भागातील हातावर पोट आसलेल्या कुटुंबाचीही आर्थिक परिस्थिती खालवल्याने ससेहोलपट सुरू झाली आहे. त्यात काहीजण हिमंतीने मार्ग काढतानाही पाहायला मिळत आहेत.अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

sakal_logo
By
सतीश निकुंभ

नाशिक / सातपूर : लॉकडाऊनमुळे केवळ शहरातील कामगारांचे नाही तर ग्रामीण भागातील हातावर पोट आसलेल्या कुटुंबाचीही आर्थिक परिस्थिती खालवल्याने ससेहोलपट सुरू झाली आहे. त्यात काहीजण हिमंतीने मार्ग काढतानाही पाहायला मिळत आहेत.अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुखी संसाराला लागली नजर, बापाचा अपराध आणि चिमुरडी झाली पोरकी

सातपूर-त्रंबक रस्त्यावर आसलेल्या वासळी गावातील आदिवासी कुटूंबातील पंडीत खेटरे यांचा बाळू हा एकुलता एक मुलगा. त्याचं लग्न मुळेदरी येथील वैशालीशी झालं होतं. त्यांना थोड्याच दिवसांपुर्वी एक मुलगी झाली. दोघे सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये मोलमजुरी करायचे त्याच्यातुन मिळणारे उत्पन्नातुन सुखीचा संसार चालु होता.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

लाकडाच्या दांडक्याने मारहाण

पण अचानक लॉकडाऊन झाले आणि दोघांच्या हातील काम गेले वडिलांचे छत्रही याच काळात हरपले. त्यामुळे घरात आर्थिक चणचण सुरू झाली त्यात बाळू काम धंदा नसल्याने व्यसनाधिन झाला. मंगळवारी (ता.१३) सकाळी बाळू व वैशाली खेटरे यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणात बाळूने लाकडाच्या दांडक्याने बायको वैशालीला मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

गुन्हा दाखल

या प्रकरणी गावातील पोलिस पाटील व इतर पदाधिकारी सातपूर पोलिसांना माहिती दिली सातपूरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे व क्राईम पिएसआय हरी राऊत पोलिस कर्मचारी समवेत घटनास्थळी तपासाला सुरवात केली. या बाबत सातपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पण या सर्व घटनेत कोरोनाच्या काळात आजोबा सोबतच आईही गेली व बाप आईच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत गेल्याने चिमुरडी मात्र पोरकी झाली आहे. 

एकुलती एक चिमुरडी मात्र पोरकी

त्रंबक रस्त्यावरील वासळी या गावात बाळू व वैशाली खेटरे या कुटूंबातील नवरा बायकोत झालेल्या भांडणात नवऱ्याने मारहाण केल्याच्या घटनेत बायकोचा मृत्यू झाला. पण यामुळे दोघा.ची एकुलती एक चिमुरडी मात्र पोरकी झाली आहे.