esakal | कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse pray god hanuman.jpg

मोसमपुल चौकातील शिवसेना संपर्क कार्यालया समोरील हनुमान मंदिरात तब्बल तीन तासाहून अधिक वेळ ठिय्या मांडला. काहीवेळ पुजा केली. या दरम्यान कृषीमंत्री भुसे उपोषणाला बसल्याची वार्ता सर्वदूर पसरली.  पण अशी कोणती चिंता त्यांना सतावत होती..की थेट त्यांना मारूतीरायाकडे जाऊन साकडे घालावेसे वाटले.

कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कृषीमंत्री दादा भुसे यींनी मोसमपुल चौकातील शिवसेना संपर्क कार्यालया समोरील हनुमान मंदिरात तब्बल तीन तासाहून अधिक वेळ ठिय्या मांडला. काहीवेळ पुजा केली. या दरम्यान भुसे उपोषणाला बसल्याची वार्ता सर्वदूर पसरली.  पण अशी कोणती चिंता त्यांना सतावत होती..की थेट त्यांना मारूतीरायाकडे जाऊन साकडे घालावेसे वाटले.

कृषीमंत्री दादा भुसे यांचे आत्मक्लेष व मौनव्रत

देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. रूग्णसंख्या पाचशे दहावर गेली. मानव जातीवरील हे संकट दूर होवू दे असे साकडे संकटमोचक हनुमानाला घालतांनाच मालेगाववर होणारी टीका व प्रशासकिय अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त करीत कृषीमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता.9)  आत्मक्लेष व मौनव्रत पाळले. मोसमपुल चौकातील शिवसेना संपर्क कार्यालया समोरील हनुमान मंदिरात तब्बल तीन तासाहून अधिक वेळ ठिय्या मांडला. काहीवेळ पुजा केली. या दरम्यान श्री. भुसे उपोषणाला बसल्याची वार्ता सर्वदूर पसरली. अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, आयुक्त त्र्यंबक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनां बाबत यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. अधिकारींनी बैठकांबरोबर उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या दरम्यान जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी त्यांची दूरध्वनीवर चर्चा झाली. प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू होती.

हेही वाचा > मालेगाव भीषण वास्तव! "रोज उठ रहे जनाजोंसे सबक न सिका तो.."सहा दिवसांत चक्क 'इतके' मातीत दफन 

"काही जण मालेगावला नाव ठेवताहेत त्याची खंत"
सकाळशी बोलतांना त्यांनी देशावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी पुजा केली. काही जण मालेगावला नाव ठेवताहेत त्याची खंत वाटते. मारूती राया सर्वांवरील संकट दूर करील या भावनेतून मी पुजा केली. मंदिरात शांत बसलो. अधिकारीची  भुसे यांच्याशी काय चर्चा झाली याचा तपशिल समजू शकला नाही.

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!