esakal | मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon mmc 123.jpg

 मालेगावात कोरोनाचा उद्रेक होत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. मनपा आयुक्त दीपक कासार यांनी 'वाडिया' शासकीय हॉस्पिटलवर छापा मारला आहे. आणि त्यात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : मालेगावात कोरोनाचा उद्रेक होत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. मनपा आयुक्त दीपक कासार यांनी 'वाडिया' शासकीय हॉस्पिटलवर छापा मारला आहे. आणि त्यात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

धक्कादायक माहिती उघड

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने हे साहित्य खरेदी केले होते. मात्र, हे साहित्य संबंधित कर्मचाऱ्यांना वाटप न करता शासकीय हॉस्पिटलच्या गोदामात लपवून ठेवण्यात आले. त्यात 3500 पीपीई किट, 20 हजार मास्क, 2000 एम-95 मास्क, फेसशिल्ड मास्क, सॅनिटायझर, थर्मल मीटर, औषधी असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आयुक्त दीपक कासार यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी भांडारपाल राहुल ठाकूर व कदीर नामक कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात हॉस्पिटलमधील आणखी काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

दरम्यान, गेल्या 24 तासांत तब्बल 55 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यामध्ये 8 पोलिस आणि 2 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. मालेगावात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 383 वर पोहोचली आहे. तर येवल्यात ही 16 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. येवल्यात कोरोनाबाधितांचा आकडा 25 झाला आहे.

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

go to top