अजितदादांचा अचूक नेम.. भुजबळ, विखे अपयशी;

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मात्र नेम न धरणेच पसंत केले... निमित्त होते. नाशिकच्या दि एसएसके वर्ल्ड क्‍लबच्या उद्‌घाटनाचे. दि एसएसके वर्ल्ड क्‍लबचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 31) श्री. पवार यांच्या हस्ते झाले. उद्‌घाटना वेळी अजित पवार यांनी बंदुकीने अचूक नेम टिपत, नेम कुठलाही असो तो अचूक टिपण्यात आपण तरबेज आहोत, हे दाखवून दिले.

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये अचूक नेम साधत राजकीय लक्ष्य साधण्यात आपण पुढे आहोत, हे भुजबळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सिद्ध केले. तर याच प्रयत्नात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ मात्र, अचूक नेम साधण्यात अपयशी ठरले. 

नेम कुठलाही असो तो अचूक टिपण्यात आपण तरबेज

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मात्र नेम न धरणेच पसंत केले... निमित्त होते. नाशिकच्या दि एसएसके वर्ल्ड क्‍लबच्या उद्‌घाटनाचे. दि एसएसके वर्ल्ड क्‍लबचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 31) श्री. पवार यांच्या हस्ते झाले. उद्‌घाटना वेळी अजित पवार यांनी बंदुकीने अचूक नेम टिपत, नेम कुठलाही असो तो अचूक टिपण्यात आपण तरबेज आहोत, हे दाखवून दिले. पालकमत्री भुजबळ यांना मात्र बंदुकीने अचूक नेम टिपता आला नाही. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मात्र नेम लागतो की चुकतो, या धास्तीने नेम न धरणेच पसंत केले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की खेळामधील नावीन्यपूर्ण बाबींसाठी नेहमीच आग्रही राहणार आहे. 

हेही वाचा > आगळावेगळा विवाहसोहळा...बघून सगळे झाले अवाक..

दूरदृष्टी आणि कर्तृत्वाची जोड - छगन भुजबळ 

"खेलो इंडिया'मधील राज्याच्या कामगिरीचे मोजमाप करत असताना, खेळांसाठी सातत्याने प्रोत्साहन देण्यात येईल. क्रीडासंकुलाच्या माध्यमातून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले पाहिजेत. पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की शहराचे वैभव वाढविणाऱ्या बाबी निर्माण होण्यासाठी दूरदृष्टी आणि कर्तृत्वाची जोड आवश्‍यक आहे. प्रदूषणमुक्त आणि सुदृढ अशी शहराची ओळख सर्वदूर झाली पाहिजे. 

हेही वाचा > उत्तर महाराष्ट्रासाठी वाढीव 332 कोटी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar said We are ahead in achieving political goals nashik marathi news