तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

पांडुरंग मूळ मांजरवाडीकर व तुकाराम खेडकर यांच्या तमाशाचा फड लावण्यात आलेला होता. रात्री तमाशा सुरू होऊन निर्धारित वेळेत तो बंद करण्यात आला. त्यानंतर कलावंत आपापल्या राहुट्यांकडे निघून गेले होते. मात्र तरीही काही मद्यपी तरुण तमाशा पुन्हा सुरू करण्यासाठी धिंगाणा घालू लागले.

नाशिक : साकूर (ता. इगतपुरी) येथील सदोबा यात्रोत्सवानिमित्ताने आलेल्या तमाशाच्या फडातील कलावंतांना मद्यपींनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. मंगळवार (ता. 4) मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित प्रकार घडला. याशिवाय, महिला कलावंताची छेड काढण्याचाही प्रकार घडल्याने याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून संशयित आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी दिली.

अशी घडली घटना...
साकूर येथे मंगळवारी नारायणगाव (जि. पुणे) येथील पांडुरंग मूळ मांजरवाडीकर व तुकाराम खेडकर यांच्या तमाशाचा फड लावण्यात आलेला होता. रात्री तमाशा सुरू होऊन निर्धारित वेळेत तो बंद करण्यात आला. त्यानंतर कलावंत आपापल्या राहुट्यांकडे निघून गेले होते. मात्र तरीही काही मद्यपी तरुण तमाशा पुन्हा सुरू करण्यासाठी धिंगाणा घालू लागले. तमाशा फडाच्या व्यवस्थापकांकडून त्यांना नकार दिला आणि शांत राहण्याचे आवाहनही केले. परंतु मद्यपी संशयितांनी आरडाओरडा करीत थेट कलावंतांच्या राहुट्यांमध्ये शिरून शिवीगाळ करीत कलावंतांना मारहाण केली. तसेच महिला कलाकारांचा विनयभंग केला. यामध्ये देवानंद कडुबा मोरे (वय 39, रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना बुधवारी (ता. 5) पहाटे पावणेपाचला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वजित जाधव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तमाशा कलावंतांना सुरक्षितस्थळी हलविले. घटनेनंतर संशयित फरारी झाले.  

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

अनोळखी मद्यपीविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा

याप्रकरणी जखमी कलावंतास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alcoholic Beating Tamasha Artists at Sakur Nashik crime Marathi News