हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू; नातेवाइकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

.युनूस शेख
Thursday, 24 September 2020

एका रुग्णावर दहा दिवसांपासून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २२) रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.काय घडले नेमके?

नाशिक : एका रुग्णावर दहा दिवसांपासून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २२) रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला.काय घडले नेमके?

नातेवाईकांचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
दिनेश शंकर जाधव रुग्णावर दहा दिवसांपासून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २२) रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यांना ऑक्सिजनची गरज असताना त्यांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा केला नाही. बंद असलेले ऑक्सिजनचे मास्क लावण्यात आल्याचा आरोपही त्यांच्या मुलाने केला. संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रुग्णालय आवारात गोंधळ घातला. भद्रकाली पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाइकांची समजूत काढण्याच्या प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू असल्याने रुग्णालय परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी (ता. २३) मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

रुग्णालय परिसरात तणावाची परिस्थिती

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत कारवाईची मागणी करत रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गोंधळ मिटला. 

 

मृत रुग्णास उपचारार्थ दाखल केले तेव्हापासून त्यांची परिस्थिती गंभीर होती. नातेवाइकांना तशी कल्पनाही देण्यात आली होती. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होता, तरीही नातेवाइकांकडून अशा प्रकारचे आरोप करण्यात आले. त्यांच्या उपचारात हलगर्जीपणा झालेला नाही. -डॉ. नितीन रावते, वैद्यकीय अधिकारी  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegations of doctor negligence at Hussein Hospital nashik marathi news