
मेलेल्या माणसाच्या टाळुवरील लोणी खाणे,ही म्हण तंतोतंत जुळणारी ही घटना..अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना चालकानेच संधी साधली. या धक्कादायक प्रकाराने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सटाणा (नाशिक) : मेलेल्या माणसाच्या टाळुवरील लोणी खाणे,ही म्हण तंतोतंत जुळणारी ही घटना..अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना चालकानेच संधी साधली. या धक्कादायक प्रकाराने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
रुग्णवाहिकाचालकाने अॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी
१६ ऑक्टोबर २०२० ला कळवाडी (ता.मालेगाव) येथील कैलास खवळे नवरात्रोत्सवानिमित्त नामपूर रस्त्याकडून सप्तशृंगगडाकडे मशाल घेऊन जात असताना येथील बागलाण ॲकॅडमीजवळ त्यांचा अपघात झाला. खवळे यांना खासगी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात रवाना केले होते. याचदरम्यान जखमी खवळे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी गायब झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांचे बंधू जितेंद्र खवळे यांनी सटाणा पोलिसांत याबाबत फिर्याद दिली होती. सटाणा पोलिसांना रुग्णवाहिकाचालक कल्पेश निकम याच्यावर संशय असल्याने त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या देहबोलीवरून पोलिसांचा संशय वाढल्याने पोलिसी खाक्या दाखवताच निकम याने सोनसाखळी काढल्याचे कबूल केले. ही साखळी त्याने ६३ हजारांना विक्री केल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले.
हेही वाचा > डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना
रुग्णवाहिकाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना चालकानेच जखमी रुग्णाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची घटना सटाणा शहरात उघडकीस आली. सटाणा पोलिसांनी संशयित रुग्णवाहिकाचालक कल्पेश निकम याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हेही वाचा > मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती