नाशिककरांनो! दुकानाच्या नव्या वेळा जाहीर; नवे आदेश लागू

विनोद बेदरकर
Thursday, 15 October 2020

 जिल्ह्यात दुकानांसाठी नव्या वेळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. पूर्वीचे जुने सगळे आदेश रद्द करून एकाच प्रकारचे नवे आदेश लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

नाशिक : जिल्ह्यात दुकानांसाठी नव्या वेळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. पूर्वीचे जुने सगळे आदेश रद्द करून एकाच प्रकारचे नवे आदेश लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

दुकानाच्या नव्या वेळा जाहीर  
जिल्ह्यात दुकानासाठी सकाळी सात ते रात्री आठ, मद्यविक्री करणारी हॉटेल/बारसाठी सकाळी अकरा ते रात्री नऊ, मद्यविक्री न करणाऱ्या हॉटेलसाठी सकाळी आठ ते रात्री नऊ तसेच वाइन शॉपसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी सात अशा वेळा निश्‍चित करण्यात आल्या होत्या. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित करण्यात आलेल्या होत्या. मात्र, शासनाने वरील अधिसूचनेच्या परिपत्रकात दिलेल्या सूचनांचा विचार करून तसेच या संदर्भात पालकमंत्री, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक या सर्वांशी चर्चा करून, आता या संदर्भातील यापूर्वीचे सर्व आदेश रद्द करून सर्व आस्थापनांसाठी गुरुवारपासून (ता.१५)पासून एकसमान सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा वेळा निश्चित केल्या आहेत.

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

सकाळी नऊ ते रात्री नऊ 
जीवनावश्यक बाबींच्या आस्थापनांसाठी वेळेची कोणतीही मर्यादा राहणार नाही. तसेच कंटेन्मेंट झोनमधील आस्थापनासाठी पूर्वीच्याच वेळेच्या मर्यादा व अन्य नियम कायम राहतील, असेही  मांढरे यांनी म्हटले आहे. त्यानुसार सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, बार सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरू राहणार आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announce new store opening and closing times nashik marathi news