अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठीचे वेळापत्रक जाहीर 

11th online.jpg
11th online.jpg

नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना 15 जुलैपासून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल. प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येईल. माहिती मान्य करण्यासाठी शाळा, मार्गदर्शन केंद्र निवडता येईल. अर्ज मंजूर झाला की नाही खात्री करता येईल. 

विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी 15 जुलैपासून सुरू 
उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी 15 जुलैपर्यंत चालणार आहे. मार्गदर्शन केंद्र, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातर्फे प्रवेश अर्जातील माहिती, भाग एक ऑनलाइन तपासून मंजूर केला जाणार आहे. आवश्‍यकता असल्यास दूरध्वनीवरून विद्यार्थ्याशी संपर्क साधायचा आहे. ऑनलाइन दहावीचा निकाल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाग दोन (पसंतीक्रम) नोंदवायचा आहे. भाग एक जमा करायचा आहे. त्याच्यापुढील प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असे केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव पी. एम. पाटील यांनी म्हटले आहे. 


ऑफलाइन प्रवेश अमान्य 
नाशिक महापालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीसाठी ऑफलाइन पद्धतीने प्रवेश दिल्यास तो अमान्य केला जाईल. आरक्षणाबद्दलच्या सुधारित तरतुदीनुसार एस. ई. बी. सी. साठी 12, दिव्यांगांसाठी 4, "इनहाउस' कोटा दहा, व्यवस्थापन कोटा पाच, अल्पसंख्याक शाळांमध्ये अल्पसंख्याक कोटा 50 टक्के राहील. प्रत्येक विद्यार्थ्याला केंद्रीय प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक असेल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांना आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात येत आहे. त्यानुसार ऑनलाइन कागदपत्रे तपासून शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावरून नोंदणी मान्यता दिली जाईल. कुणालाही समक्ष बोलवले जाणार नाही. 

महत्त्वाचे मुद्दे 
- माहितीपुस्तिका छापील असणार नाही. ऑनलाइन नोंदणीवेळी लॉगिन आय.डी. आणि पासवर्ड प्राप्त होईल. माहितीपुस्तिकेची प्रत संकेतस्थळ व मोबाईल ऍपमध्ये उपलब्ध. 
- प्रवेशप्रक्रिया शुल्क जमा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ही फेरी होणार नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com