'कन्टेन्मेंट झोन'मध्ये केली जाणार ऍन्टिबॉडीज रॅपिड टेस्ट...असा होणार फायदा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

अधिक चाचण्या वाढविण्याचा भाग म्हणून मुंबई व पुण्याच्या धर्तीवर नाशिक महापालिकाही ऍन्टिबॉडीज रॅपिड किटच्या माध्यमातून तपासण्या करणार आहे. या चाचण्यांचे वैशिष्ट्य असे, की सध्याच्या चाचणीचा रिपोर्ट हाती येण्यास पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. ऍन्टिबॉडीज रॅपिड किटच्या माध्यमातून 15 ते 30 मिनिटांमध्ये तत्काळ अहवाल प्राप्त होणार आहे.

नाशिक : शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, धडकी भरतेय... कोरोनाचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झालाहे समजत नाहीए.. पण कळणार... नो चिंता...कन्टेन्मेंट झोनमध्ये ऍन्टिबॉडीज रॅपिड किटच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका 25 हजार किट खरेदी करणार आहे. 

15 ते 30 मिनिटांमध्ये तत्काळ अहवाल

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे सांगतात शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही अधिक असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे. महापालिकेने 203 पथकांच्या माध्यमातून चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने त्याचाही परिणाम कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्यात झाला आहे. कोरोनाचा शहरात किती प्रादुर्भाव आहे ही बाब समोर आली असून, त्यामुळे अधिक चाचण्या वाढविण्याचा भाग म्हणून मुंबई व पुण्याच्या धर्तीवर नाशिक महापालिकाही ऍन्टिबॉडीज रॅपिड किटच्या माध्यमातून तपासण्या करणार आहे. या चाचण्यांचे वैशिष्ट्य असे, की सध्याच्या चाचणीचा रिपोर्ट हाती येण्यास पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. ऍन्टिबॉडीज रॅपिड किटच्या माध्यमातून 15 ते 30 मिनिटांमध्ये तत्काळ अहवाल प्राप्त होणार आहे. 

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​

लक्षणे न दिसणारे येणार उजेडात 

आयएमआरसीच्या दिशा निर्देशानुसार महापालिका सुरवातीला 25 हजार किट्‌स खरेदी करणार असून, वडाळा, फकीरवाडी, नाईकवाडीपुरा, फुलेनगर या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या माध्यमातून ज्या व्यक्तीला कोरोना झाला आहे, परंतु लक्षणे दिसली नाहीत त्यांचा अहवाल प्राप्त होणार असून, यातून कोरोनाचा शहरात किती फैलाव झाला ही बाब समोर येईल. ज्यांना कोरोना झाल्याचा संशय आहे, याबाबतची माहिती समोर येईल.  

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Antibodies will be tested in the content zone nashik marathi news