राज्यात यंदा ज्वारीसह तेलबियांचे क्षेत्र कमीच; ५४ लाख २० हजार हेक्टरवर पेरणी

jwari2.jpg
jwari2.jpg

नाशिक : राज्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ५१ लाख २० हेक्टर इतके असून, गेल्या आठवड्यापर्यंत ५४ लाख २० हजार हेक्टरवर म्हणजेच, १०५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्वारीसह तेलबियांची पेरणी कमी झाली आहे. काही ठिकाणी मका व ज्वारीवर लष्करी अळीचा, तर हरभऱ्यावर घाटेअळी आणि मररोगाचा प्रादुर्भाव आहे.

तेलबियांचे सर्वसाधारण क्षेत्र आणि गेल्या आठवड्यापर्यंत पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये अनुक्रमे असे 

करडई- ४६ हजार ४६५-१९ हजार १७१, जवस- १६ हजार ६६९-६ हजार ४६९, सूर्यफूल- १४ हजार ४१६- २ हजार ३४५, तीळ- १ हजार ६३०- १ हजार ३६२, इतर तेलबिया- १० हजार ४५- १० हजार ६३७. इतर पिकांची पेरणी मात्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक हेक्टरवर झाली असून, ती अशी (कंसात पेरणी क्षेत्राची सर्वसाधारण क्षेत्राशी तुलनात्मक टक्केवारी दर्शविते) : गहू- १० लाख ४७ हजार ५८ (११९.५८), मका- २ लाख ४४ हजार ५२८ (९२.६६), हरभरा- २३ लाख ३१ हजार १४८ (१३३.७२).

अवकाळीने तीन हजार हेक्टरचे नुकसान

अवकाळी पावसाने गेल्या आठवड्याअखेरपर्यंत राज्यातील दोन हजार ६०९ हेक्टरवरची पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले. त्यात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, डाळिंब, द्राक्षे, आंबा, कांदा, ऊस आणि भाजीपाल्याचा समावेश आहे. रब्बीमधील गहू कांडी ते ओंबी लागण्याच्या, ज्वारी पोटरी, फुलोरा ते दाणे भरण्याच्या, हरभरा फांद्या फुटणे, फुलोरा ते घाट्यातील दाणे भरण्याच्या, सूर्यफूल व करडई वाढीच्या, मका पोटरी ते कणसातील दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. खरीप हंगामातील कापूस पक्वतेच्या अवस्थेत असून, वेचणीची कामे अंतिम टप्प्यात पोचली आहेत. तूर शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून, काढणी आणि मळणीची कामे सुरू आहेत.

राज्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक जलसंचय

राज्यातील मोठ्या १४१, मध्यम २५८, लघु दोन हजार ८६८ अशा एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ७२.०७ टक्के जलसंचय होता. तो यंदा ७५.०९ टक्के इतका आहे.

विभाग धरणांची संख्या आजचा जलसंचय (टक्के) गेल्या वर्षीचा जलसंचय (टक्के)


अमरावती ४४६ ७१.१५ ६१.७२

औरंगाबाद ९६४ ७४.८७ ६१.१७

कोकण १७६ ७२.७ ७५.३१

नागपूर ३८४ ६७.०९ ६४.७६

नाशिक ५७१ ७९.१ ७९.८८

पुणे ७२६ ७७.६३ ७८.४९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com