मुंबईतील गुंडाच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या; उतरप्रदेशला पळण्याच्या होता तयारीत

विनोद बेदरकर
Sunday, 4 October 2020

नवी मुंबईतील (एमआयडीसी रबाळे) पोलीस ठाण्यात सराईत देवीप्रसाद शिवबा दूर पाल (वय १९) हा लूटमार करुन उत्तरप्रदेशला फरार होत असलेला संशयित नाशिक रोडला पकडण्यात पोलिसांनी यश आले. छापरा एक्सप्रेसने तो मुंबईतून उत्तरप्रदेशला जात असल्याची माहीती मिळाल्यावरुन ही कारवाई झाली.

नाशिक : नवी मुंबईतील (एमआयडीसी रबाळे) पोलीस ठाण्यात सराईत देवीप्रसाद शिवबा दूर पाल (वय १९) हा लूटमार करुन उत्तरप्रदेशला फरार होत असलेला संशयित नाशिक रोडला पकडण्यात पोलिसांनी यश आले. छापरा एक्सप्रेसने तो मुंबईतून उत्तरप्रदेशला जात असल्याची माहीती मिळाल्यावरुन ही कारवाई झाली. 

असा आहे प्रकार

संशयित देवीप्रसाद दूर पाल हा गुन्हेगारीत लूटमारीच्या घटनात सहभागी असल्याची माहीती मिळाल्यावरुन नवी मुंबईतील पोलिस त्याच्या मागावर होते. तो गुन्हे करुन उत्तरप्रदेशात गावाकडे जात असल्याची माहीती मिळाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सापळा लावला. संशयित आत्मज करारा रामपूर जोहनपुर उत्तर प्रदेश येथे (1059) छापरा एक्सप्रेसने जात असल्याची माहीती उपनिरीक्षक शरद आव्हाड यांनी नाशिक रोड रेल्वे पोलीसांना सांगितली. त्याचा फोटो पाठवून मदत करण्याची विनंती केली. नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू भोये, पोलीस हवलदार संतोष उफाडे, पोलीस हवलदार चंद्रभान उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल महेश सावंत, पोलीस कॉन्स्टेबल उगले यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे दुपारी अडीचला काही मिनीटे थांबणाऱ्या छापरा एक्सप्रेसची झडती घेऊन फोटतील संशयित शोधून काढला.

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

संशयिताला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक शरद आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नाशिक रोडला येउन संशयित ताब्यात घेतला.  

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested on Suspect Nashik Road in Mumbai while preparing to flee nashik marathi news