निफाडला डॉक्टर दांपत्यावर हल्ला; बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल 

माणिक देसाई
Monday, 5 October 2020

‘तू आमच्याविषयी काहीही का सांगतो’, असे म्हणूत डॉ. आहेर यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. नंतर त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

निफाड (जि.नाशिक)  : आमच्याविषयी लोकांना काहीही सांगतो, असे म्हणून येथील डॉक्टर दांपत्यास दोघा जणांनी मारहाण करत सुपारी देऊन ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी निफाड पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असा घडला प्रकार
येथील डॉ. संकेत आहेर हे शासकीय रुग्णालयात सेवा बजावित आहे. ते आपल्या घरासमोर एकाशी बोलत असताना घराजवळ राहणाऱ्या संशयित महेश पाटकर व अंशुमन पाटकर हे डॉ. आहेर यांच्याकडे येत, ‘तू आमच्याविषयी काहीही का सांगतो’, असे म्हणूत डॉ. आहेर यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. नंतर त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी डॉ. आहेर यांच्या पत्नी वाद सोडविण्यासाठी मध्ये पडल्या असता, त्यांनादेखील शिवीगाळ करत सुपारी देऊन ठार मारण्याची धमकी देत, ‘यापुढे तू डॉक्टरकीचा व्यवसाय कसा करतो तेच पाहतो’, असा दम भरला. संशयित पाटकर हे परप्रांतीय असून, निफाड येथे प्लांबिगची कामे करतात. याप्रकरणी डॉ. आहेर यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attacked on doctor couple Niphad nashik marathi news