संतापजनक! नवविवाहितेच्या तोंडात टाकले मुंग्या मारण्याचे औषध..'ती' वेदनेने तळमळत असूनही सासरच्यांचा निर्दयी प्रकार

प्रमोद सावंत
Saturday, 8 August 2020

मालेगावमध्ये घडलेल्या या प्रकाराने अक्षरश: निर्दयीपणाचा कळस गाठलाय. विवाहितेसाबत घडणाऱ्या या प्रकाराने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.

नाशिक / मालेगाव : मालेगावमध्ये घडलेल्या या प्रकाराने अक्षरश: निर्दयीपणाचा कळस गाठलाय. विवाहितेसाबत घडणाऱ्या या प्रकाराने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.

निर्दयीपणाचा कळस

पती, सासू, सासऱ्यासह पाच जण विवाहितेला हुंड्याचे पैसे आणण्याच्या कारणावरून त्रास देत होते. गुरुवारी संशयितांनी याच कारणावरून शिवीगाळ व दमबाजी केली. याच वादात घरातील मुंग्या मारण्याचे विषारी औषध जबरस्तीने पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. बशिरा इम्तियाज शेख (वय २३, रा. पवारवाडी नाला) या विवाहितेचा विवाह झाल्यापासून पती इम्तियाज मुनताज शेख (वय २८), सासू गौरी मुनताज (४६), सासरे मुनताज बाबामिया शेख (५०), दीर रियाज (२५), नणंद इरफाना आसिफ शेख (सर्व रा. पवारवाडी नाल्याजवळ) हे पाच जण हुंड्याचे पैसे आणण्याच्या कारणावरून त्रास देत होते.

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

नवविवाहितेवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

घरातील मुंग्या मारण्याचे विषारी औषध जबरस्तीने पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. नवविवाहितेवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दीर रियाज व नणंद इरफाना वगळता तिघा संशयितांना अटक केली आहे.  शहरातील पवारवाडी नाल्याजवळील वस्तीत नवविवाहितेने विवाहात ठरलेले हुंड्याचे पैसे आणावेत, यासाठी तिचा छळ, शिवीगाळ, दमबाजी करून जबरदस्तीने तिचे तोंडात मुंग्या मारण्याचे विषारी औषध ओतून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती, सासू, सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध येथील पवारवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच

 

संपादन - ज्योती देवरे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to kill a newly wedded woman for dowry money nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: