रस्त्याचे खड्डे आणि पाठीचे दुखणे;  दुचाकीचालकांमध्ये पाठदुखीचे प्रमाण अधिक

युनूस शेख
Wednesday, 30 September 2020

पावसाळा आणि रस्त्यावरील खड्डे जणू एक समीकरण झाले आहे. दरवर्षी रस्त्याना खडे पडणे नित्याची बाब झाली आहे. निकृष्ठ प्रतीचे काम झाल्याने अशा समस्याना सामोरे जावे लागत असते. त्यातून विविध आजारांसह अपघातास निमंत्रण मिळत असते.

नाशिक : शहराच्या विविध भागातील रस्त्यांवरील खड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे सुमारे ३० ते ४० टक्के वाहनधारकाना पाठ दुखीचा त्रास जाणवत आहे. विशेषता दुचाकी चालकांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. वाहनावर बसण्याची पद्धत सुधारणे तसेच पाठीचा व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. 

रस्त्यावरील खड्यामुळे पाठ दुखीचे प्रमाण वाढले

पावसाळा आणि रस्त्यावरील खड्डे जणू एक समीकरण झाले आहे. दरवर्षी रस्त्याना खडे पडणे नित्याची बाब झाली आहे. निकृष्ठ प्रतीचे काम झाल्याने अशा समस्याना सामोरे जावे लागत असते. त्यातून विविध आजारांसह अपघातास निमंत्रण मिळत असते. वृत्तपत्रात खड्यांचे वृत्त प्रसारीत होताच खड्यांमध्ये माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न होतो. पाऊस आला की खड्यांमधील माती धूतली जाते. पुन्हा परिस्थीती जैसे-थे होते. बऱ्याच वेळा खड्यात पावासाचे पाणी साचल्याने किंवा रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील खड्यांचा अंदाज येत नाही. त्यात वाहनांचे चाक आढळून पाठीस जोरदार झटका बसतो. शिवाय वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटनाही घडतात.

अनेक ठिकाणी रस्त्याना खड्डे

सद्या नागरीकांमध्ये विशेषत: वाहनचालकांना याचा सर्वाधिक त्रास जाणवत आहे. दुचाकी चालकांमध्ये अधिक प्रमाण आहे. काहीना पाठीस बेल्ट लावण्याची वेळ देखील आली आहे. सद्याही अनेक ठिकाणी रस्त्याना खड्डे दिसून येत आहे. रस्त्याच्या कामांचा दर्जा सुधारण्याची आवश्‍यकता असल्याची मागणी नागरीक करत आहे. त्याचप्रमाणे सद्या पावसात रस्त्याचे काम करणे शक्य नाही. अशा वेळेस खड्डे बुजविताना केवळ मातीचा वापर न करता. खडी डांबरचा वापर करुन सपाटीकरण करण्यात यावे. जेणेकरुन पुन्हा खड्डा तयार होणार नाही. याकडे लक्ष देण्याच्या प्रतिक्रीया नागरीकांकडून देण्यात आल्या. 

वाहनधारकांनी काळजी घ्यावी.

रस्त्यावरील खड्डे नित्याची बाब झाली आहे. पाठीच्या त्रासापासून वाचण्यासाठी शारिरीक क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे पाठीचा व्यायाम करणे, वाहनांवर बसण्याची पद्धत सुधारावी. जेणे करुन पाठीस एकदम झटका बसणार नाही. याची नागरीकानी विशेषत: वाहनधारकांनी काळजी घ्यावी. -डॉ. सागर केळकर (अस्थीरोग तज्ञ)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: back pain among cyclists due to potholes nashik marathi news