धक्कादायक! अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो..अन् तोंडाला कपडा बांधून मुलीचे अश्लील चाळे सुरु...

fake video call 1.png
fake video call 1.png
Updated on

नाशिक : काळ बदलतोय. माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होतोय. अनेकांना वाटते की, सोशल मीडिया हा आजच्या जीवनाचा जणू अविभाज्य भाग झालाय. विशेषतः युवा पिढी मोबाईल, मेसेजिंग, चॅटिंग याशिवाय जगूच शकत नाही असे वातावरण तयार झाले आहे. व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, ट्विटर,यू ट्यूब या आणि अशाच प्रकारच्या इतर समाजमाध्यमांचा व्याप आणि विस्तार वेगाने होतोय. त्यातून काही प्रमाणात चांगलेही घडत असले तरी बऱ्याच प्रमाणात विपरीत परिणाम घडू लागल्याची चर्चा होते. तरुणाईकडून सर्वाधिक विविध सोशल मीडियाचा उपयोग केला जातो. यात सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवणार्‍या तरुणांना काही भामट्यांकडून टार्गेट केले जाते. अशीच एक घटना नाशिकच्या तरुण वकिलासोबत घडली आहे.

अशी घडली घटना... 

एका अनोळखी नंबरवरून एका मुलीने त्याला व्हिडिओ कॉल केला. तोंडाला कपडा बांधलेल्या या मुलीने काही वेळातच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या तरुणाने देखील काही वेळ हा व्हिडिओ बघितला. मात्र, त्यावेळीच त्या मुलीने या मुलाचा व्हिडिओ बघतानाचा प्रसंग स्क्रिन रेकॉर्डरच्या मदतीने रेकॉर्ड केला. त्यानंतर तो यूट्यूबवर टाकत पैशाची मागणी केली. तीन हजार रुपये दिले तरच हा व्हिडिओ काढेल, असे म्हणत तरुण वकिलाला तिने ब्लॅकमेल केले. नंतर तरुणाने सायबर पोलिसात धाव घेतली.

कशी काळजी घ्याल...सायबरतज्ञांचे आवाहन..

तरुणाईकडून सर्वाधिक सोशल मीडियाचा उपयोग केला जातो. यात सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवणार्‍या तरुणांना काही भामट्यांकडून टार्गेट केले जाते. त्यानंतर बदनामी टाळण्यासाठी तरुणाईकडून पैसे दिले जातात. त्यामुळे फसवणूक होणाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या मोठी असल्याचे सायबर तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, व्हिडिओ कॉल करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक वापरून कॉल केला जातो. प्ले स्टोरवरून कॉलिंग करण्यासाठीचे अॅप्लिकेशन अथवा इंटरनेटवरील फ्री कॉलिंग करणाऱ्या वेबसाईटचा वापर करून व्हिडिओ कॉल करत फसवणूक केली जाते. फोन किंवा व्हिडिओ कॉल येतो, तेव्हा त्याच्या सुरुवातीला नेहमी कंट्री कोड असतो, जर तुम्हाला सुरुवातीला प्लस 92, 93, 374 अशाप्रकारे जर सुरुवातीला दिसले असेल, तर तुम्ही असे कॉल उचलू नका. कारण, हे इंटरनॅशनल कॉल असू शकतात आणि तुमची फसवणूक होवू शकते.कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा - तन्मय दिक्षीत - सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com