esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Ujwala Karad

कोरोनाच्या भीतीने अनेकांचे नातेवाईक रुग्णाला भेटण्यासाठीसुद्धा फिरकत नाहीत किंवा साधी चौकशीसुद्धा करताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीतही उज्ज्वला यांचे कार्य म्हणजे, त्यांनी घालून दिलेला माणुसकीचा वस्तुपाठच म्हणावा लागेल. या प्रसंगात उज्वला कराड यांनी माणुसकीचे एक जिवंत उदाहरण जगासमोर ठेवले आहे.

कोरोनाचा भयानक काळ...अशातही 'तिने' क्षणाचाही विलंब न लावता दिला पार्थिवाला खांदा! काय घडले वाचा

sakal_logo
By
माणिक देसाई

नाशिक / निफाड : कोरोनाच्या भीतीने अनेकांचे नातेवाईक रुग्णाला भेटण्यासाठीसुद्धा फिरकत नाहीत किंवा साधी चौकशीसुद्धा करताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीतही उज्ज्वला यांचे कार्य म्हणजे, त्यांनी घालून दिलेला माणुसकीचा वस्तुपाठच म्हणावा लागेल. या प्रसंगात उज्वला कराड यांनी माणुसकीचे एक जिवंत उदाहरण जगासमोर ठेवले आहे.

माणुसकीच्या धर्माची लेक बनली खांदेकरी
जळगाव (ता. निफाड) येथील रहिवासी व सेवा हाच धर्म आणि माणुसकी ही एकच जात, असे मानून प्रामाणिकपणे काम करणारे नामदेवराव कराड यांची कन्या उज्ज्वला सध्या नाशिकला जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. कोरोना संकट काळात त्यांच्या या सेवावृत्तीला चांगलीच चालना मिळाली. सेवेच्या अनेक संधींचे त्यांनी अक्षरश: सोने करत, प्रसंग कुठलाही असो, न डगमगता हिरिरीने सहभाग नोंदविला. या संपूर्ण धावपळीत अनेक बरे-वाईट अनुभव घेत आपले निष्काम सेवाव्रत सातत्याने सुरू ठेवले. दिवसभरात अनेक रुग्ण येतात, जातात. मात्र, कोरोनाच्या भीतीने अनेकांचे नातेवाईक रुग्णाला भेटण्यासाठीसुद्धा फिरकत नाहीत किंवा साधी चौकशीसुद्धा करताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीतही उज्ज्वला यांचे कार्य म्हणजे, त्यांनी घालून दिलेला माणुसकीचा वस्तुपाठच म्हणावा लागेल. या प्रसंगात, जिल्हा रुग्णालयातीलच एका कर्मचाऱ्यच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले. पार्थिव जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले; परंतु नातलग अन्य जिल्ह्यांत वास्तव्यास आहेत. कोरोनाच्या प्रभावामुळे सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध नाही.

माणुसकी जिवंत

त्यामुळे नातेवाइकांना नाशिकला येणे शक्यच नव्हते. संबंधित वृद्धेचा एक मुलगा परदेशात, तर दुसरा जिल्हा रुग्णालयातच सेवा बजावत असल्याने त्यांनाही रुग्णालयात येणे शक्य नव्हते. त्यामुळे वृद्धापकाळाने निधन झालेल्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी चार खांदेकरीही मिळणे दुरापास्त झालेले. अशा वेळी जळगावच्या या सावित्रीच्या लेकीने स्वत:हून पुढाकार घेत क्षणाचाही विलंब न करता, स्वत: खांदेकरी होत जिल्हा रुग्णालयातून रुग्णवाहिकेपर्यंत व स्मशानभूमीतही पार्थिवास खांदा देत संपूर्ण विधी होईपर्यंत सहकार्य केले. त्यामुळे, रक्ताच्या नात्यातही दुरावा पाळणाऱ्या आजच्या युगात सहकारी डॉक्टरांच्या मातोश्रींच्या अंत्यविधीत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविणाऱ्या उज्ज्वला यांच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

‘कोरोना फायटर’ बनून सर्वत्र कौतुकास पात्र

कोरोनाच्या भीतीमुळे माणूस माणसापासून दुरावतोय. एकीकडे रक्ताच्या नात्यांतही दुरावा निर्माण होत आहे, तर दुसरीकडे हाच कोरोना, मूलत: सेवाभावी वृत्ती असणाऱ्यांना पावलोपावली माणुसकीचे दर्शन घडविण्यास उद्युक्त करत आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उज्ज्वला कराड आपल्या कृतीतून याच माणुसकीचे प्रत्यक्ष दर्शन घडवत, खऱ्या अर्थाने ‘कोरोना फायटर’ बनून सर्वत्र कौतुकास पात्र ठरल्या आहेत.

हेही वाचा > निरक्षर आई- बापाची दिव्यांग लेक सुनिताने शेवटी करून दाखवलचं! पालकांचे आनंदाश्रु थांबेना...

माणुसकी श्रेष्ठ मानत मी खांदेकरी झाले.

कोरोना हा एक रोग आहे. तो आज ना उद्या जाईलही. मात्र, आपण माणूस असल्याने माणुसकी हा आपला मूळ धर्म जोपासला पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्राशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहूनच काम केले पाहिजे. पार्थिवाला खांदा द्यायचा निर्णय माझा वैयक्तिक असून, कर्तव्यनिष्ठा आणि रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ मानत मी खांदेकरी झाले.- उज्ज्वला कराड, कर्मचारी, जिल्हा रुग्णालय, नाशिक

संपादन - ज्योती देवरे

go to top