esakal | धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना
sakal

बोलून बातमी शोधा

chaure.jpg

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिवस काढले... पत्नींने देखील मोलमजुरी करत संसाराचा गाडा हाकला...पण नियतीला हे मान्य नव्हते अन् अखेर शेतकऱ्यांने घेतला अपयशाला कंटाळून असा धक्कादायक निर्णय...

धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (वडनेर भैरव) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिवस काढले... पत्नींने देखील मोलमजुरी करत संसाराचा गाडा हाकला...पण नियतीला हे मान्य नव्हते अन् अखेर शेतकऱ्यांने घेतला अपयशाला कंटाळून असा धक्कादायक निर्णय...

डोक्यावर कर्जाचा डोंगर...

वडनेर भैरव येथून जवळच असलेल्या धोंडगव्हान येथील (हल्ली मु. शिवरे, ता.चांदवड) शेतकरी खंडेराव लक्ष्मण चौरे (वय 45) यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थित दिवस काढले. पत्नी संगीता यांनीही मोलमजुरी करुन हातभार लावला. सुखाचे दिवस येतील म्हणून त्यांनी शिवरे येथे जमीनही घेतली. मात्र दिवसेंदिवस वेगवेगळ्या संकटांचा सामना करत असताना येणाऱ्या अपयशामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेला. खंडेराव चौरे यांच्यावर पिंपळगाव बसवंत येथील एच.डी.एफ.सी बँकेचे 15 लाख रुपये, पिंपळगाव मर्चंट बँकेचे 1 लाख 88 हजार, तर पत्नी संगीताच्या नावे वडनेर भैरव येथील यूनियन बँकेचे 16 लाख रुपये असे एकूण 32 लाख 88 हजार रूपये व इतर देणी 21लाख रुपये इतकी होती.

हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!

अशी घडली घटना 

खडतर परिस्थितीत जीवनप्रवास करणाऱ्या खंडेराव चौरे यांनी अखेर हार मानत आपल्या राहत्या घरासमोरील (शिवरे, ता. चांदवड) विहिरीत मंगळवारी (ता.22) उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. खंडेराव यांच्या पत्नीच्या सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडओरडा करुन लोकही जमा झाले. त्यांना विहिरीतून काढण्याचा प्रयत्नही झाला मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती. 

हेही बघा >VIDEO : कृषीमंत्री कोरोनाबाधितांसोबत तीन पावली नृत्यावर थिरकतात तेव्‍हा.. व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल!