कोरोनाशी लढताना अर्थचक्र सुरू ठेवण्याबाबत दक्षता घ्या - छगन भुजबळ

chhaganbhujbal.jpg
chhaganbhujbal.jpg
Updated on

नाशिक : कोरोनाचा वाढता उद्रेक आणि व्यावसायिकांची होत असलेली फरपट, या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 7) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कोरोनाशी लढताना अर्थचक्र सुरू ठेवण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली. स्वॅबचे प्रलंबित अहवाल मिळवत उपचाराची दिशा निश्‍चित करण्याचेही निर्देश दिले.

इतर आजारांच्या उपचारावर देखील लक्ष केंद्रित करा

श्री. भुजबळ म्हणाले, की प्रलंबित असलेले एक हजार स्वॅब अहवाल प्राप्त करून घेताना कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या उपचारावर लक्ष केंद्रित करावे. इतर आजारांचे जे रुग्ण कोरोना संशयित नाहीत, ज्यांना घरीच विलगीकरण शक्‍य आहे, त्यांचा व ज्यांना शक्‍य नाही त्याचा सारासार विचार करून निर्णय घेण्यात यावा. सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि गरज लक्षात घेऊन अमलात आणाव्यात. विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आरोग्य उपसंचालक डॉ. पट्टणशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आदी उपस्थित होते. 

जबाबदारी निश्‍चिती 

श्री. माने यांनी मालेगावच्या समन्वयाची जबाबदारी जिल्हाधिकारी, तर नाशिक शहरासाठी महापालिका आयुक्त, नाशिक ग्रामीणची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची असून, रोज त्या क्षेत्रातील कामकाजाकडे लक्ष ठेवून आहेत. एक दिवसाआड प्रत्यक्ष त्या भागात भेटी देऊन परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. 

"ही लढाई सर्वांनी एकत्रित लढण्याची' 

कोरोनाविरोधातील लढाई आपल्या सर्वांना सोबत लढायची आहे. सुरवातीपासूनच आजपर्यंत महापालिका, पोलिस व जिल्हा प्रशासनात अत्यंत घट्ट समन्वय असून, प्रशासनात कोणताही विसंवाद नाही, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे. दुकाने सुरू केल्यानंतर गर्दीमुळे पुन्हा बंद करण्यात आले. त्यापार्श्‍वभूमीवर गोंधळाच्या स्थितीबाबत ते "सकाळ'शी बोलत होते. श्री मांढरे म्हणाले, की सोशल डिस्टन्सिंग पाळून दुकाने सुरू करण्याला परवानगी दिली. जेथे उल्लंघन झाले तेथे, पोलिसांनी कारवाई केली यापुढे पोलिस तशी कारवाई करणारच. यंत्रणेतील संवाद वारंवार सिद्ध झाला आहे. दुकानांना सवलती देण्याच्या त्या आदेशातच सवलतीचा गैरफायदा घेतल्याचे दिसून आल्यास सवलती मागे घेतल्या जातील हेदेखील नमूद केले. विविध अधिसूचनांमधून दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतल्याचे अथवा उल्लंघन केल्याचे दिसल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे सर्वाधिकार पोलिस विभागास आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com