महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber-crime.png

सध्याच्या काळात आता सायबर भामट्यांनी नवाच फंडा सुरू केला असल्याचा प्रकार समोर येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या फेक आयडीद्वारे जाळे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारापासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

नाशिक : सध्याच्या काळात आता सायबर भामट्यांनी नवाच फंडा सुरू केला असल्याचा प्रकार समोर येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या फेक आयडीद्वारे जाळे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारापासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली असून असे झाल्यास थेट सायबर सेलशी संपर्क करण्याचे आवाहन सायबरतज्ञ तसेच पोलिसांकडून करण्यात येत आहे

महिलांच्या फोटोचा गैरवापर करत पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर भामटे पुरुषांच्या मोबाइल नंबरवर फ्रेन्डशिप करण्यासाठी मेसेज केले जातात.  त्यावेळी अश्लील विडिओ कॉल करत स्क्रीन रेकॉर्ड करून विडिओ क्लिप तयार करून ब्लॅकमेलिंग करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर भामटे पुरुषांना फसवण्यासाठी, सोशल मीडिया माध्यमावर महिलांच्या फोटोचा गैरवापर करत महिलेची वाटेल तशी प्रोफाइल तयार करून पुरुषांना जाळयात अडकविले जात आहे. सोशल मीडियावर व्हाट्सअप नंबर स्वतःहून देत आवाज बदलणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करून पुरुषांशी महिलेच्या आवाजात गप्पा मारून विश्वास संपादन करतात. आणि मग सुरु होतो सायबर भामट्यांचा खेळ ! पोर्नोग्राफ़िकल क्लिप खरी आहे असे भासवत स्क्रीन रेकॉर्डिंगच्या साहाय्याने त्या व्यक्तीची क्लिप रेकॉर्ड करून वायरल करायची धमकी देत पैसे उकळतात. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता


ह्या पासून कसे वाचायचे? सायबरतज्ञ सांगतात...

१. आवश्यक असलेल्या महत्वाच्या व्यक्तींनाच आपल्या सोशलमीडिया प्रोफाईला ऍड करावे.


२. सोशल मीडिया अकाऊंटची गोपनीयता सेटिंग प्रणाली हि उत्तम ठेवावी. 


३. महत्वाच्याच कामासाठीच विडिओ कॉलचा वापर करावा 


४. असं काही घडत असल्यास, त्याचे पुरावे जमा करून ठेवा ज्यामुळे सायबर भामट्यांना पकडण्यास मदत होईल.

५. असे झाल्यास थेट सायबर सेलशी संपर्क करण्याचे आवाहन

-तन्मय स दीक्षित, 
सायबरतज्ञ, नाशिक

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

Web Title: Beware Cyber Crime Fake Id Blackmailing Nashik Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Social MediaNashik
go to top