भाजपच्या आमदार फरांदे यांचे मुख्यमंत्र्यांकडे निषेध पत्र ...म्हणताएत...

विक्रांत मते
Thursday, 6 August 2020

अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी भूमिपूजनाच्या निमित्ताने नाशिक शहरात रामभक्तांकडून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते पण..

नाशिक : अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी भूमिपूजनाच्या निमित्ताने नाशिक शहरात रामभक्तांकडून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले परंतू पोलिसांकडून परवानगी नाकारताना कारवाई करण्यात आल्याचा निषेध आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निषेधाचे पत्र पाठविले. 

हेही वाचा : दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच 

बुधवारी (ता. ५) राम जन्मभुमी शिलान्यासाच्या भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी नाशिक शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यत आले होते. परंतू पोलिसांनी कार्यक्रम होवू दिला नाही व उलट कारवाई केल्याने आमदार फरांदे यांनी पत्र लहिले, नाशिक पोलिसांकडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली. कार्यक्रमांसाठी परवानगी मागितली असता पोलसांनी घरी जावून परवानग्या नाकारल्या. 
यामागे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता. काळाराम मंदिरातील पोलिस बंदोबस्त प्रभु श्रीरामालाचं बंदीस्त करण्याचा प्रकार असल्याचे पत्रात म्हटले. पोलिसांवर कार्यवाईची मागणी करण्यात आली. 

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mla devyani farande write a letter to letter chief minister marathi news