वयोवृद्ध शेतकऱ्यांनीही पहिलांदाच अनुभवलं घोंघावणारं 'हे' संकट...नेमकं काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे येथील डोंगरावर ठिकठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले आहेत. सागाच्या झाडावर आलेली बहारदार हिरवीगार मोठमोठी पाने नष्ट होत आहे. त्यामुळे सागाच्या झाडाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. 

नाशिक : (कळवण) या भागातील वयोवृद्ध आदिवासी शेतकऱ्यांनी प्रथमच काळ्या अळीचा सागावर झालेला प्रादुर्भाव अनुभवला. यासंदर्भात महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, कळवण (प्रादेशिक) यांना योग्य उपाययोजना कराव्यात, असे निवेदन शुक्रवारी (ता.26) दिले. 

कळवण तालुक्यातील आदिवासी शेतकरी हैराण 

तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात जिरवाडे, जामले, दरेगाव, कोसुरडे, भाकुरडे, करंभेळ, कुमसाडी आदी भागांतील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या डोंगरावर विविध प्रकारची जंगली झाडे आहेत आणि जूनमध्ये झालेल्या पावसामुळे परिसरात व डोंगरावर सर्वत्र हिरवळ दिसते. साग आपल्या मोठमोठ्या पानामुळे अधिकच बहरत सर्वांचे लक्ष वेधून घेते. मात्र अज्ञात अळीच्या प्रादुर्भावामुळे येथील डोंगरावर ठिकठिकाणी पांढरे भुरकट पट्टे निर्माण झाले आहेत. सागाच्या झाडावर आलेली बहारदार हिरवीगार मोठमोठी पाने नष्ट होत आहे. त्यामुळे सागाच्या झाडाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. 

हेही वाचा > आनंदवार्ता! जिल्ह्यातील 'हे' चार तालुके झाले कोरोनामुक्‍त...एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

वेळीच या अज्ञात अळीवर उपाययोजना न केल्यास तसेच अळीने इतर झाडांकडे मोर्चा वळविल्यास इतर झाडे व डोंगर उताऱ्यावर असलेल्या शेतीबरोबरच परिसरातील बागायत शेतीत या अळीने शिरकाव केल्यास आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हेही वाचा > VIDEO : अमर रहे..वीरजवान सचिन मोरे अमर रहे..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The black larvae pose a threat to the saga tree nashik marathi news