esakal | Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 
sakal

बोलून बातमी शोधा

eSakal (26).jpg

 भरपूर अभ्यास करताना दुसरीकडे कुटुंब सांभाळून स्वकष्टातून चरितार्थाचीही बाजू सांभाळली. आपल्या स्वप्नांचा पाठलाग दृष्टिबाधित ज्ञानेश्र्वर सुरूच ठेवला होता. त्‍याच्‍या या प्रयत्‍नांना अखेर यश आले.

Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : भरपूर अभ्यास करताना दुसरीकडे कुटुंब सांभाळून स्वकष्टातून चरितार्थाचीही बाजू सांभाळली. आपल्या स्वप्नांचा पाठलाग दृष्टिबाधित ज्ञानेश्र्वर सुरूच ठेवला होता. त्‍याच्‍या या प्रयत्‍नांना अखेर यश आले.

दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी

दृष्टिबाधित ज्ञानेश्र्वर क्षीरसागर या होतकरू तरुणाने बँक अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. सोशल नेटवर्किंग फोरमच्‍या माध्यमातून दिनदर्शिका (कॅलेंडर) विक्री करताना त्‍याने अर्थार्जन सुरू ठेवले होते. दुसरीकडे जिद्द व चिकाटीच्‍या जोरावर परीक्षांचा अभ्यासही सुरू ठेवला. त्‍याच्‍या या प्रयत्‍नांना अखेर यश आले. ज्ञानेश्‍वर क्षीरसागर यांना या वर्षीच्‍या सुरवातीस सोशल नेटवर्किंग फोरमने अर्थार्जनासाठी कॅलेंडर विक्रीचा स्‍टॉल सुरू करून दिला होता. सोशल मीडियावरील कॅलेंडर खरेदीचे आवाहन केले होते. त्‍यास प्रतिसाद मिळताना मोठ्या प्रमाणावर कॅलेंडरची विक्री झाली होती. कष्ट, जिद्दीच्‍या जोरावर ज्ञानेश्वर क्षीरसागर या होतकरू तरुणाची बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्‍हणून निवड झाली.

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी

तीन-चार वर्षांपूर्वी ज्ञानेश्र्वरसह काही दृष्टिबाधित सदस्यांच्या ऑर्केस्ट्रा आयोजनात सोशल नेटवर्किंग फाउंडेशनने मदत केली होती. तेव्हापासून तो फाउंडेशनसोबत जोडला गेला. त्याच्या उपजीविकेसाठीही वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला होता. या वर्षीच्या सुरवातीला लावून दिलेल्या कॅलेंडर विक्रीच्या स्टॉलमधूनही त्याला अर्थार्जन झाले. दरम्‍यानच्‍या काळात त्याने बँक अधिकारी पदाच्या परीक्षेची तयारी केली. भरपूर अभ्यास करताना दुसरीकडे कुटुंब सांभाळून स्वकष्टातून चरितार्थाचीही बाजू सांभाळली. आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवताना त्‍याने लेखी आणि मुलाखतीत यश मिळवत त्याची कॅनरा बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.  

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

go to top