
पोलिसांनी काही धागेदोरे हाती लागतात का? यासाठी त्यानी परिसरातील अन्य भागाची पहाणी केली. तसेच न्याय वैद्यकीय पथकास घटनास्थळी पाचारण करत मृतदेहाची पाहणी करण्यात आली. तपासनीसाठी काही नमुने घेण्यात आले. दरम्यान शहरातील विविध पोलिस ठाण्यात असलेल्या बेपत्ता युवतींच्या वर्णनांशी मृत युवतीचे वर्णन मिळते. का याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे पोलिसानी सांगीतले.
नाशिक : तपोवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर अज्ञात युवतीचा विवस्त्र मृतदेह आढळून आल्याने परिसरात खडबळ उडाली आहे. शनिवार (ता.१२) दुपारी सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास प्रकार उघकीस आला. भद्रकाली पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यानी घटनास्थळी भेट देत पहाणी केली. युवतीचा घात-पात झाला असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या दिशेने पोलिस तपास करीत आहे.
लांब चंदेरी कागदाच्या खाली युवतीचा मृतदेह
तपोवन परिसरातून जाणाऱ्या नदी काठावर मोकळा भूखंड आहे. त्याठिकाणी कुणी येत जात नाही. निर्जनस्थळ असल्याने मोठ्या प्रमाणावर डेब्रीज तसेच कचरा आणून टाकला जातो. अशा एका डेब्रीज (मातीच्या ढिगाऱ्या) जवळ लांब चंदेरी कागदाच्या खाली युवतीचा मृतदेह आढळून आला. दुपारच्या सुमारास काही मुले पतंग उडवित होते. त्याना मृतदेह दिसला. त्यानी चंद्रकांत थोरात याना सांगीतले. त्यानी भद्रकाली पोलिसाना घटनेची माहिती दिली.
हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण
कपड्यांच्या तुकड्यावरुन ती सुशिक्षीत घरातील असल्याची शक्यता
पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानी मृतदेहाची पहाणी करत वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही. पायास दोरी बांधली असल्याचे आढळून आले. मृत महिलेचे वय अतिशय कमी असून त्याठिकाणी आढळून कपड्यांच्या तुकड्यावरुन ती सुशिक्षीत घरातील असल्याची शक्यता पोलिसानी व्यक्त केली.
हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या
बेपत्ता युवतींच्या वर्णनांशी मृत युवतीचे वर्णन मिळते का?
पोलिसानी काही धागेदोरे हाती लागतात. का यासाठी त्यानी परिसरातील अन्य भागाची पहाणी केली. तसेच न्याय वैद्यकीय पथकास घटनास्थळी पाचारण करत मृतदेहाची पाहणी करण्यात आली. तपासनीसाठी काही नमुने घेण्यात आले. दरम्यान शहरातील विविध पोलिस ठाण्यात असलेल्या बेपत्ता युवतींच्या वर्णनांशी मृत युवतीचे वर्णन मिळते. का याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे पोलिसानी सांगीतले.
जागेवर शवविच्छेदन
युवतीचा मृतदेह बऱ्याच दिवसापासून त्याठिकाणी पडून असल्याने तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. शवविच्छेदनसाठी जिल्हा रुग्णालयात मृतदेह घेवून जाणे शक्य नसल्याने जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याना घटनास्थळी बोलावून घेतले. जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन करत तपासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे नमुने घेण्यात आले.