पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

यूनुस शेख
Friday, 11 December 2020

नेहमीप्रमाणे रात्री स्वरूप हा घराच्या वरच्या मजल्यावर एकटाच झोपण्यासाठी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो खाली आला नाही. आईने दार ठोठावले. प्रतिसाद येत नसल्याने दार ढकलून आत प्रवेश केला असता प्रकार लक्षात आला. ही घटना बुधवारी (ता.९) सकाळी जुने नाशिक भोईगल्ली परिसरात घडली.

नाशिक : नेहमीप्रमाणे रात्री स्वरूप हा घराच्या वरच्या मजल्यावर एकटाच झोपण्यासाठी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो खाली आला नाही. आईने दार ठोठावले. प्रतिसाद येत नसल्याने दार ढकलून आत प्रवेश केला असता प्रकार लक्षात आला. ही घटना बुधवारी (ता.९) सकाळी जुने नाशिक भोईगल्ली परिसरात घडली.

मोबाईल गेममुळे नैराश्य?

गेल्या वर्षात पबजीमुळे देशासह राज्यात अनेक आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर त्या गेमवर बंदी घालण्यात आली होती. परंतु गेल्या महिन्यापासून स्वदेशी पबजी गेम नागरीकांमध्ये विशेषता लहानमुलांमध्ये आकर्षण ठरल्याचे बोलले जात आहे. असे असेल तर मग नागरीकांमध्ये चिंता वाढविणारी बाब आहे. 

सकाळी लक्षात आला प्रकार

भोई गल्ली येथील राहत्या घरी बुधवारी (ता. ९) सकाळी आठच्या सुमारास स्वरुपने छताच्या हुकला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतल्याचे आढळले. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्री तो घराच्या वरच्या मजल्यावर एकटाच झोपण्यासाठी गेला. बुधवारी सकाळी तो खाली आला नाही. आईने दार ठोठावले. प्रतिसाद येत नसल्याने दार ढकलून आत प्रवेश केला असता प्रकार लक्षात आला. उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हवालदार एस. टी. दळवी तपास करीत आहेत. 
दरम्यान स्वरुपच्या आत्महत्येने जुने नाशिक परिसरास चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

लॉकडाऊन आणि ऑनलाईन गेम

बुधवारी तसेच गुरुवारी (ता.१०) रोजी दिवसभर परिसरात मोबाईलमधील पबजी गेममुळे आत्महत्या केल्याची चर्चा सुरु होती. खरे कारण काय आहे. पोलिस अदीक तपास करीत आहे. मोबाईल गेममुळे त्यास जीव गमवावा लागल्याचे खरे असेल तर मग पुन्हा एकदा पबजी गेम नागरीकांवर हावी होत आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नागरीकांनी त्यांच्या लहानमुलांकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. सद्या गेल्या ९ महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालयाना सुट्या सुरु आहे. वेळ घालविण्यासाठी सर्वच वयातील मुले मुली मोबाईलकडे आकर्षित झाले आहे. मोबाईलमध्ये असलेले तसेच आॅनलाईन गेम खेळण्यात ते नेहमी दंग दिसून येतात. त्याना मोबाईलपासून दूर ठेवणे काळाजी गरज झाली आहे. मुलांकडे वेळीस लक्ष देत पायबंद घातला नाही. तर भविष्यात असे प्रकार वाढण्याची शक्यता नागरीक व्यक्त आहे.  

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 year old boy commits suicide due to mobile game nashik marathi news