esakal | मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट
sakal

बोलून बातमी शोधा

darshan sogras.jpg

 मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो अखेरचा सोहळा...आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.. दोन मित्रांची कायमची ताटातूट झाली. काय घ़डले वाचा...

मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट

sakal_logo
By
धनंजय वावधने

सोग्रस (जि.नाशिक) : मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो अखेरचा सोहळा...आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.. दोन मित्रांची कायमची ताटातूट झाली. काय घ़डले वाचा...

दर्शनच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो अखेरचा सोहळा...

दर्शन दिलीप धनवटे (वय २१, रा. केडगाव, स्वामी समर्थ मठाजवळ, भूषणनगर, जि. नगर) मित्रांसह खेलदरी येथील मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी आला होता. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तो काही मित्रांसमवेत खेलदरी शिवारातील विजय जाधव यांच्या शेतात गट नंबर ३७९ मधील शेततळ्यात आंघोळीसाठी गेला. शेततळ्यातील पाण्याच्या खोलीचा दर्शनला अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या शेतातील काम करणाऱ्या शेतकऱ्यांना घटनास्थळी बोलावले.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

आणि दर्शनला मृत घोषित केले..

ग्रामस्थांनी प्रयत्न करून दर्शनला शेततळ्याबाहेर काढत उपचारासाठी त्वरित चांदवड येथील रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत म्हणून घोषित केले. घटनेसंदर्भात खेलदरीचे सरपंच राहुल यादव यांनी वडनेरभैरव पोलिस ठाण्यात माहिती दिली.  खेलदरी (ता. चांदवड) येथील शेततळ्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१९) सकाळी साडेआठच्या सुमारास येते घडली.

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

go to top