esakal | बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..
sakal

बोलून बातमी शोधा

pimplegaon mor burning home.jpg

 शेतकऱ्याच्या नशिबी दुर्दैव का? असा प्रश्न पुन्हा एकदा या बातमीने अधोरेखित झाला आहे. कारण आधीच अवकाळी पावसाने झोडपलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होत असताना आणखी आता काय बघायचं बाकी आहे..असा सवाल या बळीराजाकडून विचारला जातोय.

बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

sakal_logo
By
गौरव परदेशी

खेडभैरव (जि. नाशिक) : शेतकऱ्याच्या नशिबी दुर्दैव का? असा प्रश्न पुन्हा एकदा या बातमीने अधोरेखित झाला आहे. कारण आधीच अवकाळी पावसाने झोडपलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होत असताना आणखी आता काय बघायचं बाकी आहे?..असा सवाल या बळीराजाकडून विचारला जातोय.

जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

पिंपळगाव मोर येथील गावालगत असलेल्या नामदेव बेंडकोळी यांचे कौलारू आणि सिमेंट पत्र्यांचे घर असून, तेथे ते कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरात पत्नी सीताबाई बेंडकोळी यांच्या नावे उज्ज्वला योजनेचे एच. पी. गॅस कंपनीचे सिलिंडर आहे. गुरुवारी (ता.१७) सकाळी साडेदहाच्या सुमारास घरात अगोदर जोडलेले सिलिंडर संपले. तेव्हा दुसरे सिलिंडर जोडताना स्फोट झाला. स्फोट होताच त्यांच्या घराने पेट घेतला.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

क्षणार्धात सारं काही संपलं..

घोटी येथील हिंदुस्थान बिझ ॲन्ड गॅस सर्व्हिसचे जयप्रकाश नागरे, अधिकारी, वितरक तसेच मॅकेनिक, आग विझवण्याचे सिलिंडर घेऊन हजर झाले. त्यांनी घोटी टोल प्लाझा येथे कळवून येथील अग्निशमन दलाला पाचारण केले.पिंपळगाव मोर येथील गावालगत असलेल्या शेतकऱ्याच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला अन् शेतकरी कुटुंबाच्या घर- संसाराची राखरांगोळी झाली. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

स्फोटाची तीव्रता भीषण

स्फोटाची तीव्रता इतकी होती, की घरावरील कौलारू खाली पडले. तसेच भिंतही कोसळली. ग्रामस्थांनी टँकरमधील पाणी घरावर टाकून आग विझवली. तलाठी संदीप कडनोर यांनी पंचनामा केला. आग विझविण्यासाठी मुरलीधर गातवे, जयराम काळे, गोटीराम काळे, रवी डगळे आदींनी मदत केली. 

go to top