
वडिल व त्यांची मुलगी खासगी कामासाठी नाशिकला कारने जात होते. पण कदाचित त्या पित्यालाही अंदाज नव्हता कि आपली लेकीला आता आपण शेवटचचं पाहतोय. वाटेतच काळ आडवा आला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊन बसलं. काय घडले वाचा...
बोरगाव (ता. सुरगाणा) : वडिल व त्यांची मुलगी खासगी कामासाठी नाशिकला कारने जात होते. पण कदाचित त्या पित्यालाही अंदाज नव्हता कि आपली लेकीला आता आपण शेवटचचं पाहतोय. वाटेतच काळ आडवा आला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊन बसलं. काय घडले वाचा...
पिता आणि लेकीच्या समोर काळ आडवा आला...
बोरगाव येथील डॉ. प्रकाश गायकवाड व त्यांची मुलगी खासगी कामासाठी नाशिकला जात असताना घागबारी (ता. सुरगाणा) येथे चालक डॉ. गायकवाड यांचा कार (एमएच १५ सीएम ४१४५) वरील ताबा सुटल्याने गाडी आंब्याच्या झाडावर आदळली. यात कारमधील प्रज्ञा गायकवाड (वय २२) ठार झाली, तर चालक डॉ. गायकवाड (५०) जखमी झाले. प्रज्ञाच्या मृत्यूने बोरगाव व परिसरात शोककळा पसरली.
हेही वाचा - शुभमंगल सावधान आणि 'त्यांच्या' पासूनही जरा सावधान! टार्गेट सप्तपदीचा मुहूर्त
लेकीचे अंत्यसंस्कार आणि अख्खे गाव हळहळले
भांडणे (ता. कळवण) येथे त्यांच्या मूळगावी प्रज्ञावर अंतिम संस्कार करण्यात आले. सापुतारा-बोरगाव-वणी महामार्गावरील घागबारी (ता. सुरगाणा) येथे कार झाडावर आढळून तरुणी ठार झाली.
हेही वाचा - निनावी पत्रावरून पोलीसांनी लावला शोध, हाती लागली धक्कादायक माहिती